शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

ऋतुरंग सांस्कृतिक कला महोत्सवाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:33 IST

ऋतुरंग भवनमध्ये आयोजित तीन दिवसीय ऋतुरंग कला व सांस्कृतिक उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

नाशिकरोड : ऋतुरंग भवनमध्ये आयोजित तीन दिवसीय ऋतुरंग कला व सांस्कृतिक उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.ऋतुरंग परिवाराच्या वतीने बिझनेस बॅँक, दीपक बिल्डर्स व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने आयोजित केलेल्या तीन दिवसीय ऋतुरंग कला व सांस्कृतिक उत्सवात पहिल्या दिवशी उद्घाटनानंतर पंचरत्न हा संगीतमय कार्यक्रम पार पडला.  दुसऱ्या दिवशी ‘संवादरंग’ या कार्यक्रमात माझ्या नव्याची बायको या गाजलेल्या मालिकेतील अभिजित खांडकेकर (गुरूनाथ) व अनिता दाते (राधिका) यांची प्रकट मुलाखत तन्वी अमित हीने घेतली. यावेळी अभिनय किंवा कोणतेही क्षेत्र असो, यशाचा फॉर्म्युला नसतो. यशासाठी जिद्द, कठोर मेहनत, बारीक अभ्यासाची गरज असते. वेळेची कदर करा. देरे हरी खाटल्यावरी अशी तुमची धारणा असेल तर काहीच मिळणार नाही, असे खांडकेकर व दाते यांनी स्पष्ट केले. नाशिकच्या या कलाकारांनी आपल्या चतुरस्त्र अभिनयाने फिल्म इंडस्ट्रीत ठसा उमटवला आहे. ही काटेरी वाटचाल कशी केली, यश कसे मिळवले याचे रहस्य या दोघांनी मुलाखतीत सांगितले.ऋतुरंग महोत्सवाच्या रविवारी समारोपाच्या दिवशी ‘एमएच १५ बॅन्ड’ या कार्यक्रमात गायक राहुल आंबेकर आणि सनी वाघ यांनी हिंदीसह विविध प्रादेशिक भाषेतील गाजलेली गाणे सादर केली. त्यांना ड्रमवर विनेश नायर, की बोर्डवर गणेश जाधव यांनी साथसंगत केली. यावेळी रसिक उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक