बाजीराव कमानकर ।सायखेडा : खरिपाच्या तोंडावर पीककर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना भांडवलाची चिंता भेडसावू लागली आहे, त्यातच दुकानदारांकडून अव्वाच्या सव्वा प्रमाणात वसुली होत असल्याने बळीराजा मेटाकुटीस आला आहे.जून महिन्यात पावसाला सुरुवात होते आणि खरीप हंगामातील पिकांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होते. या हंगामातील पेरणी करावयाची पिके आणि नगदी पिके यांच्यासाठी मुबलक भांडवल असेल तर शेतकरी शेतात चांगल्या प्रकारचे पीक उभे करू शकतो, मात्र गेल्या काही वर्षांपासून शेतकºयांची अर्थवाहिनी असणारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक डबघाईस आली. यामुळे जिल्हा बँकेच्या पतपुरवठ्यावर उभे असणाºया गावागावांतील सोसायट्या अडचणीत आल्या आहेत. जवळपास ९० टक्के शेतकºयांना कर्जपुरवठा होत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. फुले कृषी सन्मान योजनेंतर्गत शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, अशा शेतकºयांच्या खात्यात पैसे वर्ग करावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.शासनाने महात्मा फुले कृषी सन्मान योजना सुरू करून दोन लाख रु पयांच्या आत कर्ज असणाºया शेतकºयांचे कर्ज माफ केले, मात्र या कर्ज खात्यावर शासनाकडून कोणत्याही प्रकारची रक्कम प्राप्त झाली नाही. त्यामुळे शासनाच्या दृष्टीने कर्जमाफी झालेले शेतकरी मात्र बँकेच्या दप्तरी कर्जदार दिसत आहेत. त्यामुळे बँकेकडून नवीन कर्ज, पीककर्ज मिळत नसल्याने खरीप हंगामाच्यासुरु वातीलाच शेतकरी अडचणीत सापडले आहेत.४अनेक शेतकरी कृषी उद्योग-व्यवसाय करणाºया दुकानदारांकडून बी-बियाणे, खते, औषधे काही दिवसांच्या बोलीवर उधारीत घेतात. मात्र उधारीवर माल देताना दुकानदार शेतकºयांकडून अव्वाच्या सव्वा दराने पैसे वसूल करतात, त्यामुळे पिकासाठी होणारा खर्च वाढतो. पिकांसाठी लागणारे भांडवल फेडताना शेतकºयांच्या नाकीनव येते.महाविकास आघाडीच्या सरकारने महात्मा कृषी सन्मान योजनेअंतर्गत दोन लाख रु पये कर्ज असणाºया शेतकºयांना कर्जमाफी दिली. पात्र असणाºया शेतकºयांच्या खात्यात मात्र अद्याप कोणत्याही प्रकारचे पैसे वर्ग झाले नाही, त्यामुळे त्यांना नवीन पीककर्ज कोणत्याच बँकांकडून मिळत नाही. शेतकºयांना तत्काळ पीककर्ज मिळावे.- गोकुळ गिते, माजी संचालक, बाजार समिती, पिंपळगावखरीप हंगामातील पेरणी करावयाच्या पिकांची तसेच नगदी पिकांच्या लागवडीचा हा काळ असून, यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल शेतकºयांना लागते. मात्र गेल्या काही वर्षांपासून शेतकºयांना पतपुरवठा करणाºया सहकारी सोसायट्या आणि जिल्हा बँक अडचणीत असल्याने त्यांच्याकडून कर्ज मिळत नाही. त्यामुळे सुधारित दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणामध्ये बियाणे, खते खरेदी करावी लागतात.- सुरेश कमानकर, शेतकरी, भेंडाळी
पीककर्ज मिळत नसल्याने खरिपाच्या भांडवलाची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:28 IST
खरिपाच्या तोंडावर पीककर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना भांडवलाची चिंता भेडसावू लागली आहे, त्यातच दुकानदारांकडून अव्वाच्या सव्वा प्रमाणात वसुली होत असल्याने बळीराजा मेटाकुटीस आला आहे.
पीककर्ज मिळत नसल्याने खरिपाच्या भांडवलाची चिंता
ठळक मुद्देशेतकरी मेटाकुटीला : दुकानदारांकडून अव्वाच्या सव्वा वसुली; सोसायट्या अडचणीत