शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रद्दीचा भाव दुप्पट झाल्याने द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 16:18 IST

खडेगाव : दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी मागील वर्षीपासून अडचणी सापडला असून दिवसो दिवस द्राक्ष शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात समस्या वाढत असून पुढील बाजार भावाचा कोणताही अदांज नसताना खर्च मात्र वारेमाप वाढत आहे त्यात सध्या बाजारामध्ये रद्दीचा भाव चाळीस रुपये प्रती किलो झाला आहे मागील वर्षीच्या तुलनेत रद्दीच्या भावात दुप्पटीने वाढ झाल्यांमुळे द्राक्ष उतपादक हातबल झाल्याचे दिसून येत आहे.

खडेगाव : दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी मागील वर्षीपासून अडचणी सापडला असून दिवसो दिवस द्राक्ष शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात समस्या वाढत असून पुढील बाजार भावाचा कोणताही अदांज नसताना खर्च मात्र वारेमाप वाढत आहे त्यात सध्या बाजारामध्ये रद्दीचा भाव चाळीस रुपये प्रती किलो झाला आहे मागील वर्षीच्या तुलनेत रद्दीच्या भावात दुप्पटीने वाढ झाल्यांमुळे द्राक्ष उतपादक हातबल झाल्याचे दिसून येत आहे.             करोनामुळे मागील द्राक्ष हंगाम संपूर्णपणे तोट्यात गेला काही शेतकऱ्यांनी द्राक्ष पाच ते दहा किलोने मातीमोल भावात विकली तर काही शेतक-यांनी शेताच्या बांधावर खडून टाकली होती तर अनेक शेतक-यांना व्यापारी वर्गाने कवडीमोल भावात पैसे दिले आहे तरी द्राक्ष उत्पादक शेतकरी नव्या उमेदीने उभा राहून चालू हंगाम पार पाडण्याचा प्रयत्न करित आहे.

        त्यांत मुजराना पैसे हे रोख स्वरूपात द्यावे लागतात सध्या द्राक्षकामाची मजुरी वाढ झाली असून द्राक्ष घडांच्या थिनिंगसाठी एकरी १४ ते १५ हजार रुपये मजुरी दयावी लागत असून डिपिंगसाठी चार ते साडेचार हजार रुपये तर छाटणीचा खर्च पाच हजार रुपये त्याप्रमाणे अतिरिक्त मनी काढण्यासाठी सात ते आठ हजार एकरी मजुरी दयावी लागते द्राक्ष बागेत वर्षभर कामगती ही चालू असते त्यांमुळे द्राक्ष उत्पादकाला एक किलो द्राक्ष तयार करण्यासाठी ३० ते ३५ रुपये सध्या येत आहे.सध्या बाजारामध्ये रासायनिक खताच्या किंमती मध्ये प्रंचड वाढ झाल्यामुळे ५० किलोच्या गोणीला १३०० ते १४०० रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागतात तसेच किटकनाशक बुरसीनाशकाच्या किंमती गगनाला भिडल्या आहे डिपिंगचे एक औषध तीन ते साडेतीन हजार रुपये प्रतिलिटर आहे तर विदव्य खताची २५ किलोच्या गोणीची किंमती दोन हजारापासून तीन हजारापर्यत वाढलेली आहे.

               त्यांमुळे सध्या शेतक-यांना द्राक्ष शेताचा ताळमेळ लागत नाही आशी सर्व परिस्थिती असताना द्राक्षाचे घड झाकण्यासाठी लागण- यां रद्दीच्या भागात मागील वर्षीपेक्षा दुप्पटीने भाव झाल्यांमुळे द्राक्षउत्पादक हतबळ झाल्यांचे दिसून येत आहे. त्यांत अजून करोनाची लस आलेली नाही आणि थोडयाच दिवसात द्राक्ष हंगाम सुरु होणार असल्यामुळे द्राक्षउत्पादकां मध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.प्रतिक्रिया...करोनाची परिस्थिती असताना गेल्या ९ ते १० महिन्यापासून वर्तमानपत्राची छपाई अतिशय कमी प्रमाणात होत आहे त्यांमुळे बाजारामध्ये रद्दीचा तुटवडा निर्माण झाला आहे मात्र निर्यातक्षम द्राक्षबागाना घडाच्या सुरक्षितेसाठी तसेच गुणवत्ता व थंडीपासून संरक्षण करण्यासाठी पेपर लावणे आवश्यक आहे त्यांमुळे चालू वर्षी रद्दीचा खर्च वाढणार आहे- सुनिल शिंदे ( द्राक्ष अभ्यासक नाशिक)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी