शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

औषधांची वाहने अडकून पडल्याने चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 17:06 IST

नाशिकमध्ये दिल्ली, कर्नाटक, हरयाना, पंजाब आदी राज्यांमधून तसेच मुंबई, पुणे, अकोला, अमरावती आदी जिल्ह्यांमधून एसटी, ट्रक आणि खासगी वाहनाने औषधांचे पार्सल येतात.

ठळक मुद्देसंचारबंदीमुळे औषधांचे ट्रक प्रवासातच थांबलेले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : कोरोनाचा धोका वाढला असतानाच नाशिक शहरात व जिल्ह्यात औषधांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. घाऊक विक्रेते असलेल्या गोळे कॉलनीतही स्टाक मर्यादित आहे. देशभर लाकडाउन व संचारबंदी लागू आहे. औषधांचे ट्रक दुसऱ्या राज्यात व जिल्ह्यांमध्ये अडकून पडले आहेत. सरकारने त्यांना परवानगी दिलेली असली तर वाहतूक संघटना, ट्रकचालक धोका पत्करण्यास तयार नाहीत.

नाशिकरोडच्या औषध विक्रेत्यांनी सांगितले की, नाशिकमध्ये दिल्ली, कर्नाटक, हरयाना, पंजाब आदी राज्यांमधून तसेच मुंबई, पुणे, अकोला, अमरावती आदी जिल्ह्यांमधून एसटी, ट्रक आणि खासगी वाहनाने औषधांचे पार्सल येतात. हा माल ठक्कर बाजाराला येतो. मात्र, एसटी वाहतूक व कार्यालय बंद असल्याने माल सोडवता आलेला नाही. हरियाना व पंजाबमधील व्हीआरएल, गती, टीसीआय एक्स्प्रेस या ट्रान्सपोर्ट कंपन्या औषधे व जीवनावश्यक माल पाठवितात. मात्र, कोरोनामुळे जारी केलेल्या संचारबंदीमुळे औषधांचे ट्रक प्रवासातच थांबलेले आहेत. सध्या सॅनिटायझर, मास्क, कफ सिरफ, पॅरासिटॅमाल, क्लोरिक्वीन, हायड्रो क्लोरीक्वीन, संसर्गाला प्रतिबंध करणारी औषधांना मागणी वाढली आहे. नेमका हाच माल अडकून पडलेला आहे. सध्याची औषधे व माल जास्तीत जास्त दोन दिवस चालेल, नंतर औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. घाऊक औषध विक्रेते असलेल्या नाशिकच्या गोळे कॉलनीतही अशीच स्थिती आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले. सध्याच्या आणीबाणीच्या काळात औषध कंपन्या चालू ठेवाव्यात असे सरकारचे धोरण आहेत. संचारबंदीतून औषध व अन्य जीवनावश्यक मालाच्या वाहतुकीला सूट देण्यात आलेली असली तरी अंमलबजावणी होत नाही. मालवाहतूक संघटना धोका घेण्यास तयार नाहीत. त्यांना पोलीस संरक्षण हवे आहे. नाशिकरोडला किरकोळ व घाऊन मिळून दोनशेच्यावर औषध विक्रीची दुकाने आहेत. त्यांनाही औषध टंचाईची समस्या येऊ शकते. मास्क, सॅनिटायझर, संसर्गजन्य औषधांची मागणी सध्या जास्त आहे. हा माल नसल्यामुळे ग्राहक निराश होत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक