शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:32 IST

गेल्या सहा महिन्यांपासून मानधन रखडल्याने उपासमारीची वेळ आली असून, राज्यातील ग्रामपंचायत स्थरावरील सर्व संगणक परिचालकांचे २५ सप्टेंबरपासून विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू असल्याने ग्रामपंचायतींच्या आॅनलाइन सुविधा व कामकाज ठप्प झाले आहे.

वडनेर : गेल्या सहा महिन्यांपासून मानधन रखडल्याने उपासमारीची वेळ आली असून, राज्यातील ग्रामपंचायत स्थरावरील सर्व संगणक परिचालकांचे २५ सप्टेंबरपासून विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू असल्याने ग्रामपंचायतींच्या आॅनलाइन सुविधा व कामकाज ठप्प झाले आहे.  ग्रामपंचायतींच्या कामकाजात पारदर्शकता व सुसूत्रता आणण्यासाठी शासनाने महाआॅनलाइन कंपनीशी २०११ मध्ये करार करून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये संग्राम प्रकल्पात एक संगणक परिचालक असे राज्यात २७ हजार संगणक परिचालकांची नियुक्ती केली. त्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायती असे तीन स्थरात विभागणी कारण्यात आली होती; परंतु २०१५ साली शासनाने महाआॅनलाइन कंपनीशी केलेला करार संपुष्टात आल्याने राज्यातील २७ हजार संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.  राज्य संगणक परिचालक संघटनेने राज्यात अधिवेशनाच्या काळात ठिकठिकाणी आंदोलने केली. शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीत आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करून त्यात ‘संग्राम’मधील संगणक परिचालकांचाच केंद्र ाालक म्हणून समावेश करण्यात आला तसेच मासिक ६ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु प्रत्यक्षात सहा ते सात महिने काम करुनही मानधनाची रक्कम मिळालेली नाही. टास्क कन्फर्मेशेनची जाचक अट लावल्याने केंद्रचालकांना मानधनापासून वंचित रहावे लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजनेचे अर्ज रात्रंदिवस केंद्रचालकांनी विनामोबदला भरून दिले. टास्क कन्फर्मेशनची अट रद्द करून निर्णयाप्रमाणे ६ हजार इतके मानधन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला मिळावे, संग्राममधील राहिलेले परिचालकाना आपले सरकारमध्ये सामावून घ्यावे, कपात केलेले मानधन अदा करावे, थकीत मानधन अदा करणे आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. संघटनेतर्फे गटविकास अधिकारी आनंदराव पिंगळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष नितीन खोमणे, उपाध्यक्ष भूषण बागुल, सचिव दुर्गेश बच्छाव, सुनील पाटील, मिलिंद खडताळे, प्रमोद बोरसे, अशपाक मन्सुरी, नरेंद्र अहिरे, जयराम सोनवणे आदीसह केंद्र चालक उपस्थित होते.टास्क कन्फर्मेशनची अट रद्द करण्याची मागणीमासिक ६ हजार मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु प्रत्यक्षात सहा ते सात महिने काम करूनही मानधन मिळालेले नाही. टास्क कन्फर्मेशेनची जाचक अट लावल्याने केंद्रचालकांना मानधनापासून वंचित रहावे लागत आहे. मालेगाव टास्क कन्फर्मेशनची अट रद्द करून शासन निर्णयाप्रमाणे निश्चित केलेले ६ हजार इतके मानधन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला मिळावे, संग्राममधील परिचालकांना आपले सरकारमध्ये सामावून घ्यावे, कपात केलेले मानधन अदा करावे, थकीत मानधन अदा करणे आदी मागण्यांचे निवेदन परिचालक संघटनेतर्फे गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांना सादर करण्यात आले.