शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

युरियासोबतच इतर खते घेण्याची सक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 00:13 IST

कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, पिंपळगाव, भरवीर परिसरात खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांतून युरियाची मागणी वाढत आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन युरियासह इतर दुसरे खतदेखील शेतकऱ्यांच्या माथी मारले जात असल्याचा प्रकार परिसरातील कृषिसेवा केंद्रांकडून होत असल्याने सरसकट लूट केली जात असल्याची भावना शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे इगतपुरी तालुक्यातील प्रकार : कृषिसेवा केंद्र बदलले, दरही बदलतो

लोकमत न्यूज नेटवर्ककवडदरा : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, पिंपळगाव, भरवीर परिसरात खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांतून युरियाची मागणी वाढत आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन युरियासह इतर दुसरे खतदेखील शेतकऱ्यांच्या माथी मारले जात असल्याचा प्रकार परिसरातील कृषिसेवा केंद्रांकडून होत असल्याने सरसकट लूट केली जात असल्याची भावना शेतकºयांमधून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे कृषिसेवा केंद्र बदलले, खतांचे दरही बदलत असल्याने संबंधित विभागाने यावर गांभीर्याने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.कृ षी विभागाने लक्ष देण्याची मागणीतालुक्यात सर्वत्र चांगला पाऊस असल्याने शेतशिवार फुलले आहे. मागील कित्येक दिवसांपासून पिकांना युरियाची मोठ्या प्रमाणावर गरज भासत असल्याने शेतकºयांकडून मागणी वाढत आहे; परंतु मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने तालुक्याच्या विविध भागात खताचा तुटवडा जाणवत आहे. खताची मागणी करणाºया शेतकºयांना युरिया नसल्याचे कृषिसेवा केंद्रांकडून सांगितले जाते. मात्र विनंती केल्यास युरिया पाहिजे असेल, तर पोटॅश, पॅमेशिअम आणि तणनाशके घेण्याची सक्ती केली जाते.गरज नसताना शेतकºयांना युरियासोबत इतर खते घ्यावी लागत आहेत. त्यामुळे शेतकºयांची आर्थिक पिळवणूक होत असल्यामुळे कृषी विभागाने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.इगतपुरी तालुक्यातील अनेक कृषिसेवा केंद्रांसमोरील दरफलकही गायब झाले आहेत. कोणत्या बियाणांची किती किंमत आहे, कृषी केंद्रामध्ये औषधे, बियाणे, खते यांचा किती साठा आहे याची माहिती देणारा फलक केंद्रात दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे; मात्र बोटावर मोजता येतील एवढ्याच दुकानांत फलक आहेत. बाकी सर्वच केंद्रांतील फलक गायब झाले आहेत. त्यामुळे बियाणांचे, खताचे दर माहीत नसल्याने शेतकºयांच्या खिशाला झळ बसत आहे. दरफलक नसलेल्या कृषी केंद्रावर कारवाई करण्याची गरज आहे.- संतोष निसरड,शेतकरी संघटना, कवडदरा

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी