शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्याक समाजाकडून संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 01:42 IST

गोवर-रुबेला लसीकरणासाठी शहरातील मुस्लीम बहुल भागात असलेल्या गैरसमजाविषयी महापालिकेने विविध संस्था आणि धर्मगुरू यांच्या माध्यमातून प्रबोधन केल्यानंतरदेखील शंभर टक्के प्रतिसाद मिळालेला नाही.

नाशिक : गोवर-रुबेला लसीकरणासाठी शहरातील मुस्लीम बहुल भागात असलेल्या गैरसमजाविषयी महापालिकेने विविध संस्था आणि धर्मगुरू यांच्या माध्यमातून प्रबोधन केल्यानंतरदेखील शंभर टक्के प्रतिसाद मिळालेला नाही. ९ हजार ७८९ मुलांपैकी ४,१०५ मुलांचे लसीकरण करण्यात आले असून, उर्वरित लसीकरणासाठी वैद्यकीय विभाग पाठपुरावा करणार आहे. दरम्यान, शहरात एकूण ८२ टक्के लसीकरण करण्यात आले आहे. शासनाने मोहिमेची मुदत २५ जानेवारीपर्यंत वाढवून दिली असून त्यामुळे ९० टक्के लसीकरण होईल, असे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.राज्य शासनाने गोवर-रुबेला लसीकरणासाठी महापालिकेला दिलेले उद्दिष्ट ७४ टक्क्यांपर्यंतच अडकले होते, मात्र महापालिकेने मध्यंतरी मोहीम व्यापक केली. त्यातच अल्पसंख्याक समाजात विशेषत: मुस्लीम बहुल भागात असलेल्या गैरसमाजामुळे लसीकरणाला प्रतिसाद मिळत नव्हता. काही शाळांनी तर लसीकरणास थेट नकार दिला होता. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने गेल्या १४ जानेवारीस मुस्लीम समाजाचे धर्मगुरू, शिक्षण संस्था तसेच सेवाभावी संस्थांची बैठक घेतली आणि त्यांच्यातील गैरसमज दूर करून लसीकरणासाठी प्रबोधन करण्याचे आवाहन केले होते. गेल्या शुक्रवारी मशिदीत नमाज पठणाच्या वेळी आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी (दि.१९) मुस्लीम बहुल भागात विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आली. महापालिकेने लसीकरण न झालेल्या ९ हजार ७८९ लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले होते.नाशिक महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात आली. त्याचबरोबर शहरातील १ हजार ६८९ बालरोग तज्ज्ञांचीदेखील मदत घेऊन त्यांच्या दवाखान्यात जाऊन महापालिकेने लसीकरण केले. त्यामुळे लसीकरणाचा टक्का वाढला आहे.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य