सातपूर : केंद्र सरकारच्या प्रस्तावित कामगार कायद्यातील बदलांच्या विरोधात कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीतील सीटूप्रणीत युनियन असलेले उद्योग बंदमध्ये सहभागी झाले होते. उर्वरित कारखाने या बंदमध्ये सहभागी न झाल्याने या बंदला संमिश्र प्रतिसाद लाभला.केंद्रातील मोदी सरकार कामगार कायद्यात बदल करीत असून, यातील बदल हे उद्योग धार्जिणे असल्याचा आरोप करणाऱ्या डाव्या पक्षांच्या संघटना याशिवाय अन्य कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनाही सहभागी झाल्या होत्या. या देशव्यापी संपात सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील सीटू प्रणित युनियन असलेले कारखाने तसेच डाव्या पक्षांच्या संघटना पूर्णपणे सहभागी झाल्या होत्या. मात्र ज्या कारखान्यांत याव्यतिरिक्त संघटना आहेत किंवा अंतर्गत कामगार संघटना असलेले कारखाने या बंदमध्ये सहभागी झाले नसल्याने हा देशव्यापी बंद शंभर टक्के यशस्वी झाला नाही. या बंदला संमिश्र प्रतिसाद लाभला.या देशव्यापी बंदमध्ये सहभागी व्हावे म्हणून लोकांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत काही ठिकाणी घडला; परंतु वेळीच पोलिसांनी हटकल्याने या दबावाचा फायदा परिणाम झाला नाही. (वार्ताहर)
‘औद्योगिक बंद’ला संमिश्र प्रतिसाद
By admin | Updated: September 3, 2015 23:51 IST