शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: June 6, 2017 03:33 IST

नाशिक : शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, शेतीमालाला हमीभाव या प्रमुख मागण्यांसह इतरही मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.५) पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, शेतीमालाला हमीभाव या प्रमुख मागण्यांसह इतरही मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.५) पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला नाशिकमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही शेतकरी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मेनरोड परिसरात दुकाने बंद करण्याचे आवाहन केल्यानंतर दुकाने बंद झाली. परंतु पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याने काही व्यावसायिकांनी पुन्हा दुकाने उघडली. यावेळी शेतकऱ्यांनी सत्ताधारी भाजपासह राज्यात व केंद्रात सत्तेत सहभागी शिवसेनेविरोधातही घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला. शेतकरी संपात फूट पडल्याच्या चर्चेनंतर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत पूर्वनियोजित राज्यव्यापी बंद अधिक प्रभावीपणे करण्याचा निर्णय झाला. परंतु, आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी पुढे आलेल्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख शहर नाशिकमध्येच वेगवेगळ्या भागात संपाला संपूर्ण प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले. शहरातील व्यावसायिकांनी सकाळपासूनच नियमित त्यांची दुकाने उघडली. परंतु, शेतकऱ्यांचा संपा दरम्यान सरकारच्या सूचनांनुसार विविध मोबाइल कंपन्यांनी इंटरनेट बंद केल्याने आंदोलकांमधील संपर्क कमी झाला. शहर परिसरातील ग्रामीण भागात आंदोलन सांभाळतांना शेतकऱ्यांनी शहराकडे लक्षच दिले नाही.