शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

बँकांमध्ये संमिश्र स्थिती

By admin | Updated: December 31, 2016 00:05 IST

रांगा संपल्या : कॅशलेस पर्यायांचा अभाव; बँकांची असमर्थता

नाशिक : केंद्र सरकाने ८ नोव्हेंबर रोजी एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर ५० दिवस उलटूनही परिस्थिती संपूर्णपणे सुधारली नसून अद्यापही शहरातील प्रमुख बँकांमध्ये गर्दी दिसून येत आहे, तर काही बँकांमध्ये मात्र शुकशुकाट आहे. एटीएमसमोरच्या रांगाही संपल्या असल्या तरी अद्याप शहरातील बहुतांश एटीएममध्ये पैसे मिळत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, शहरातील सर्व एटीएम सुरू करण्याची मागणी होत आहे. विमुद्रीकरण प्रक्रियेत जुन्या नोटा जमा करण्याच्या शेवटच्या दिवशी ज्यांना गेल्या ५० दिवसांच्या कालावीत नोटा जमा करता आल्या नाहीत त्यांनी शुक्रवारी आपल्याकडे असलेली शेवटची हजार तथा पाचशेची नोटही बँकेत जमा केली. त्यामुळे दैनंदिन व्यवहार करणाऱ्यांसोबतच थोड्याफार प्रमाणात जुन्या नोटा जमा करणाऱ्यांचीही बँकांमध्ये वर्दळ दिसून आली. बँकांमध्ये असलेल्या गर्दी पैकी अनेकजण पैसे काढण्यासाठी अथवा चेक वटविण्यासाठीच रांगेत उभे असल्याचे दिसले. भरणा करणाऱ्यांची संख्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले. विविध बँकांचे चेक सर्व्हर डाउन अथवा इंटरनेटसारख्या तांत्रिक अडचणींमुळे रखडले आहेत, तर सहकारी बँकांमध्ये अद्यापही पुरेसे चलन पोहोचले नसल्याने अशा बँकांमध्ये व्यवहार अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. राष्ट्रीयीकृत बँकांमध्येही गर्दी विरळ प्रमाणात असली तरी यात बहुतांश ग्राहक पैसे काढणारेच असल्याने बँकांसमोर चलन पुरवठ्याचा प्रश्न कायम आहे. बँकांमध्ये होणारा भरणा ग्राहकांच्या तुलनेत अपुरा असल्याने बँकाकडून रिझर्व्ह बँकेकडे आणखी रकमेची मागणी सुरू आहे. (प्रतिनिधी)