शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शब्दसुरांसह रंगली गप्पांची मैफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:19 IST

कवी कुसुमाग्रज यांच्या ‘प्रेम कर भिल्लासारखे बाणावर खोचलेलं’, विं. दा. करंदीकर यांची ‘देणाऱ्यांना देत जावे घेणाऱ्याने घेते जावे’ व ‘सारे तिचेच होते, सारे तिच्याचसाठी; हे चंद्र, सूर्य, तारे होते तिच्याच पाठी’आदी विविध कवितांचे रंगतदार सादरीकरण करतानाच साहित्यिकाच्या आठवणींना उजाळा देतानाच यशंवतराव चव्हाणांविषयी किस्स्यांनी निवेदक मिलिंद कुलकर्णी यांच्यासोबत कला व साहित्य रसिकांच्या गप्पा रंगल्या.

नाशिक : कवी कुसुमाग्रज यांच्या ‘प्रेम कर भिल्लासारखे बाणावर खोचलेलं’, विं. दा. करंदीकर यांची ‘देणाऱ्यांना देत जावे घेणाऱ्याने घेते जावे’ व ‘सारे तिचेच होते, सारे तिच्याचसाठी; हे चंद्र, सूर्य, तारे होते तिच्याच पाठी’आदी विविध कवितांचे रंगतदार सादरीकरण करतानाच साहित्यिकाच्या आठवणींना उजाळा देतानाच यशंवतराव चव्हाणांविषयी किस्स्यांनी निवेदक मिलिंद कुलकर्णी यांच्यासोबत कला व साहित्य रसिकांच्या गप्पा रंगल्या.महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नाशिक विभागीय केंद्रातसोमवारी (दि.११) दिलखुलास-मैफीली मिलिंद कुलकर्णी यांनी यशंवतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला सुसंस्कृत, समाजकारणाची दिशा दिल्याचे मत व्यक्त केले. कला-साहित्य-संस्कृतीच्या विकासासाठी चव्हाण यांनी मोठे योगदान दिले असून त्यांचे स्मरण म्हणजे त्यांच्या विचारांची जोपासना असल्याचे सागितले़ त्यांनी शांता शेळके, सुधीर मोघे, वैभव जोशी, लता मंगेशकर, आशा भोसले, यांच्या कलाकर्तुत्वाच्या आठवणींना उजाळा देत कवितांचे सादरीकरण करीत मैफलीत रंगत भरली. प्रास्ताविक विश्वास ठाकूर यांनी केले. यावेळी डॉ. सुधीर संकलेचा, डॉ. मनोज शिंपी, ज्योत्स्ना कुलकर्णी व विवेक केळकर, अ‍ॅड. नितीन ठाकरे, डी. जी. हंसवाणी आदी रसिक उपस्थित होते.कवी, कलावंत, साहित्यिकांनी आपल्या विलक्षण आविष्काराने रसिकांना अनेकांचे जीवन समृद्ध केल्याचे सांगतानाच ग. दि. मांडगुळकरांनी काव्य, गीतांतून जीवनगाणे जगासमोर आणले. गुलजारांनी कवितेतून सामान्य माणसाची अस्वस्थता आपल्या गीतांतून संवेदनशीलतेने रेखाटली. विं. दा. करंदीकर, पु. ल. देशपांडे, कवी बा. भ. बोरकर, मंगेश पाडगावकर यांनी आपल्या लेखनातून गावाकडचे जग, चालीरिती विविध शब्दांतून मनावर रेंगाळत ठेवण्याचे काम केल्याचेही कुलकर्णी म्हणाले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक