नाशिक : दोन वर्षांपूर्वी विशेष बाब म्हणून नाशिक जिल्'ातील चांदवड, इगतपुरी व कळवण तालुक्यांत मंजूर करण्यात आलेल्या व दोन वर्षांपूर्वीच पूर्ण झालेल्या सुमारे एक कोटी ५ लाख रुपयांच्या दलित वस्ती सुधार योजनेच्या कामांना निधी असूनही तो खर्च करण्यात विभागाला अपयश आल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे विभागाला प्राप्त झालेला सुमारे ३५ लाखांचा निधी कामे पूर्ण होऊनही संबंधित ग्रामपंचायतींच्या निष्काळजीपणामुळे या ३५ लाख रुपयांतून ही कामांची देयके अदा करता न आल्याने हा निधी व्यपगत झाला आहे. आता हा निधी खर्च करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने समाजकल्याण विभागासह वित्त विभागाकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. जिल्'ात दोन वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या प्रयत्नामुळे जिल्'ाला एक कोटी पाच लाखांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला होता. त्यातून दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत चांदवड तालुक्यात दलित वस्तींना जोडणाऱ्या रस्ता क्राँकिटीकरणाची व गटारची चार कामे मंजूर होऊन ती पूर्णही झाली. त्याचप्रमाणे इगतपुरी तालुक्यात तीन तसेच कळवण तालुक्यात सात कामे मंजूर करण्यात आली. ही सर्व कामे दोन वर्षांपूर्वीच पूर्ण झाली. तसेच कामांपोटी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने प्रत्येक कामावर ४० टक्के रक्कमेची देयकेही अदा केली. प्रत्यक्षात आता कामे पूर्ण होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटलेला तरी संबंधित मक्तेदार व मजूर संस्थाचालकांना उर्वरित ६० टक्के निधी मिळालेला नाही. याबाबत समाजकल्याण विभागाने आता या कामांचे दायित्व देण्यासाठी समाजकल्याण मागील वर्षी याच कामांसाठी आलेला मात्र खर्च न झालेल्या ३५ लाखांच्या अनुदान खर्चास परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. (प्रतिनिधी)
कामे पूर्ण तरीही अनुदान नाही, ३५ लाख अखर्चित दलित वस्ती सुधार योजनेतील प्रकार
By admin | Updated: March 6, 2015 00:35 IST