शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सुरगाणा ग्रामीण रुग्णालयाबाबत तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:22 IST

येथील ग्रामीण रुग्णालयाबाबत तक्रारी असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी दिलेल्या भेटीत उघड झाले आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद गट हट्टी येथे आयोजित बैठकीसाठी आलेले शिवसेनेचे दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, विधानसभा संपर्कप्रमुख केसरनाथ पाटील यांच्यासमोर रुग्णांनी येथील ग्रामीण रुग्णालयातील गैरसोयींची तक्रार केली.

सुरगाणा : येथील ग्रामीण रुग्णालयाबाबत तक्रारी असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी दिलेल्या भेटीत उघड झाले आहे.तालुक्यातील जिल्हा परिषद गट हट्टी येथे आयोजित बैठकीसाठी आलेले शिवसेनेचे दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, विधानसभा संपर्कप्रमुख केसरनाथ पाटील यांच्यासमोर रुग्णांनी येथील ग्रामीण रुग्णालयातील गैरसोयींची तक्रार केली. यानंतर पदाधिकाºयांनी सुरगाणा ग्रामीण रुग्णालयास भेट दिली असता येथे अनेक तक्रारी असल्याचे उघडकीस आले. एक महिना गैरहजर असूनही येथील डॉक्टरने त्या महिन्याचे वेतन काढून घेतल्याची गंभीर बाब शिवसेना पदाधिकाºयांनी येथील ग्रामीण रुग्णालयात दिलेल्या भेटीत समोर आली आली आहे. रुग्णांच्या नातेवाइकांनी रुग्णालयातील गैरसोयींबाबत पदाधिकाºयांकडे अनेक तक्रारी केल्या आहेत.  हट्टी येथे गटनिहाय बैठकीसाठी आलेले शिवसेनेचे लोकसभा, विधानसभा संपर्कप्रमुख व जिल्हाध्यक्ष यांनी येथील ग्रामीण रुग्णालय व मुलांच्या शासकीय वसतिगृहाला भेट दिली असता काही त्रुटी आढळून आल्याने याबाबत आपण चौकशीची मागणी करणार असल्याचे सांगितले.  शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, कळवण- सुरगाणा विधानसभा संपर्कप्रमुख केसरनाथ पाटील आदी पदाधिकाºयांनी सुरगाणा ग्रामीण रुग्णालय, मुलांचे शासकीय वसतिगृह, बाºहे ग्रामीण रुग्णालय आदी ठिकाणी भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत तालुकाप्रमुख मोहन गांगुर्डे, नगरसेवक भारत वाघमारे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी अधिकारी व कर्मचारी हजर नसतात मात्र रजिस्टरवर सह्या असतात. केलेल्या सह्या एकाच दिवशी केल्याची बाब निदर्शनास आल्याचे ग्रामीण जिल्हाप्रमुख तांबडे यांनी म्हटले आहे. औषध साठा पुरेसा नसल्याने बाहेरून औषधे आणावी लागत असल्याचे यावेळी रुग्णांच्या कुटुंबीयांनी सांगितले. कर्मचारी वर्गदेखील कमी असल्याचे सांगण्यात आले. बोरगाव येथेही स्टाफ कमी असल्याचे सांगण्यात आले. येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहाची पाहणी केली असता इमारतीमधील शौचालयांची दुरवस्था झालेली दिसून आली.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाhospitalहॉस्पिटल