शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

स्त्री रुग्णालयाविरोधात पालकमंत्र्यांकडे गार्हाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 14:08 IST

नागरिकांचा विरोध : सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन

ठळक मुद्दे आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार वसंत गिते यांच्यातील वाद नागरिकांना येणाऱ्या अडचणींचा पाढा पालकमंत्र्यांसमोर

नाशिक : भाभानगर येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहालगत स्त्री रुग्णालयास जागा देण्यास स्थानिक नगरसेवकासह नागरिकांनी विरोध तीव्र करत सोमवारी (दि.३०) पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन साकडे घातले. यावेळी, पालकमंत्र्यांनी सदर रुग्णालयाच्या जागेबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन नागरिकांना दिले.भाभानगर येथील स्त्री रुग्णालयाला जागा देण्यावरून भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार वसंत गिते यांच्यातील वाद पेटला आहे. मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महापौरांना तातडीने भाभानगरच्या जागेचा ठराव करून देण्याचे आदेशित केले होते. त्यामुळे भाभानगरच्या नागरिकांसह स्थानिक नगरसेवक व उपमहापौर प्रथमेश गिते यांनी सोमवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर वस्तुस्थिती कथन केली. भाभानगर येथे स्त्री रुग्णालयाला जागा दिल्यास परिसरातील कायदा व सुव्यवस्थेसह नागरिकांना येणाऱ्या  अडचणींचा पाढा यावेळी पालकमंत्र्यांसमोर वाचण्यात आला. पालकमंत्र्यांनी नागरिकांची म्हणणे ऐकून घेत रुग्णालयाच्या जागेबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाभानगर ज्येष्ठ नागरिक बहुउद्दिष्ट सेवा समितीचे अध्यक्ष पी. व्ही. क्षीरसागर, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर, श्रीमती पटेल, चंद्रकांत थोरात, मिलिंद भालेराव आदींसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Womenमहिलाhospitalहॉस्पिटल