शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी भिडे यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 01:20 IST

आपल्या शेतातील आंबे खाल्ल्याने दीडशे कुटुंबांना मुले झाल्याचा दावा केल्याप्रकरणी शिव प्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर तथा संभाजी भिडे यांच्यावर अखेरीस नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल केली आहे. त्यामुळे कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नाशिक : आपल्या शेतातील आंबे खाल्ल्याने दीडशे कुटुंबांना मुले झाल्याचा दावा केल्याप्रकरणी शिव प्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर तथा संभाजी भिडे यांच्यावर अखेरीस नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल केली आहे. त्यामुळे कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  गेल्या १० जून रोजी नाशिकमध्ये शिव प्रतिष्ठानच्या मेळाव्यात बोलताना, आपल्या शेतातील आंबे असून ते १८० कुटुंबांना दिले. त्यातील दीडशे दाम्पत्यांना मुलेच झाल्याचा दावा केला होता. यासंदर्भात पुणे येथील आरोग्य उपसंचालकांच्या आदेशानुसार महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. या विभागांतर्गत असलेल्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीची बैठक पार पडली. त्यात भिडे यांच्या वक्तव्याची व्हिडीओ फीत बघून चौकशी केली असता सकृतदर्शनी भिडे दोषी आढळले होते. मात्र, भिडे यांनी यासंदर्भात नोटीस स्वीकारली नव्हती. दरम्यान, यासंदर्भात पुन्हा समितीची बैठक वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयराम कोठारी व डॉ. प्रशांत थेटे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी पुढील कार्यवाही करण्याचे ठरविण्यात आले. भिडे यांचे वक्तव्य गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवड प्रतिबंध) अधिनियम २००३ अंतर्गत कलम २२ चे उल्लंघन असल्याने त्यांच्याविरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. आता नियमानुसार त्यावर न्यायालयाकडून भिडे यांना समन्स बजावून पुढील कार्यवाही होणार आहे. भिडे यांना न्यायालयाने दोषी ठरविल्यास तीन वर्षे कारावास व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा होऊ शकेल. ‘त्या’ मुलाखतीचीही दखलमध्यंतरी संभाजी भिडे यांनी टीव्ही १८ लोकमतला मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी आंबे प्रकरणाची चर्चा सुरू झाल्यावर यासंदर्भात आपल्याकडे पुरावे असून, ते न्यायालयात सादर करू, असा दावा केला होता. या मुलाखतीदरम्यान त्यांचे विधानदेखील न्यायालयात सादर केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय