शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक संरक्षण समितीकडे वीज कंपनीविरुद्ध तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 01:32 IST

जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या बैठकीत वीज वितरण कंपनीच्या विरोधात समिती सदस्यांनी तक्रारींचा पाढा वाचून जंत्रीच सादर केली. दोन वर्षांपासून तक्रारी करूनही वीज कंपनी सोडवणूक करीत नसल्याने कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी यावेळी सदस्यांनी केली.

नाशिक : जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या बैठकीत वीज वितरण कंपनीच्या विरोधात समिती सदस्यांनी तक्रारींचा पाढा वाचून जंत्रीच सादर केली. दोन वर्षांपासून तक्रारी करूनही वीज कंपनी सोडवणूक करीत नसल्याने कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी यावेळी सदस्यांनी केली.  या तक्रारींमध्ये प्रामुख्याने वीज वितरण कंपनीच्या नियमानुसार प्रत्येक वीज ग्राहकास फोटोमीटर रिडिंगनुसारच वीज बिल देण्यात यावे, असे ठरलेले असताना दिंडोरी तालुक्यातील मातेरेवाडी येथील १७५ शेतकºयांना गेल्या आठ वर्षांपासून अंदाजे व खोटी, अवास्तव वीज बिले देण्यात येत असल्याने सदर शेतकºयांच्या वीज बिलांत दुरुस्ती करण्यात यावी व त्यांना वीज कंपनीने भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय सिन्नर तालुक्यातील वीज ग्राहक ठोंबरे यांना विजेचा पुरवठा करणारा वीज पोल पडला त्याबाबत वीज कंपनीकडे तक्रार करूनही विजेचा पोल दुरुस्त करण्यात आला नाही. परिणामी वीजपुरवठा खंडित झाल्याने ठोंबरे यांचे पीक बुडाले, त्यास वीज कंपनीच जबाबदार असल्याची तक्रार करण्यात आली असून, ठोंबरे यांनी तक्रार केल्यापासून प्रतिदिन वीज कंपनीने १२०० रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. वीज ग्राहकांचे हक्क व अधिकार तसेच भरपाईचे निश्चितीकरणाबाबत वीज कंपनीने त्यांच्या प्रत्येक वीज बिल भरणा केंद्रावर तसेच ग्रामपंचायत कार्यालयांवर फलक लावावेत. त्याचबरोबर वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी, अधिकाºयांनी गणवेश परिधान करावा व त्यावर नेमप्लेट लावण्याचा नियम असून, तसे न केल्यास संबंधिताना दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. परंतु अधिकारी व कर्मचारी त्याचे पालन करीत नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत वीज तक्रारींची तत्काळ सोडवणूक करण्याचे आदेश संबंधित अधिकाºयांना देण्यात आले, त्याचबरोबर बैठकीच्या इतिवृत्तात त्याची नोंद घेऊन पुढच्या बैठकीत तक्रारींवर वीज कंपनीने काय कार्यवाही केली, याचा अहवालही ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

टॅग्स :Nashikनाशिक