शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

वीरगाव संस्थेतील अपहारप्रकरणी तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:56 IST

बागलाण तालुक्यातील वीरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या तपासणीत सुमारे ३७ लाखांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या अपहारास तत्कालीन संचालक मंडळ जबाबदार असून, यासाठी जिल्हा उपनिबंधकांचे संगनमत अथवा मदत केल्याचा ठपका नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पालक अधिकारी प्रदीप शेवाळे यांनी ठेवला आहे.

सटाणा : बागलाण तालुक्यातील वीरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या तपासणीत सुमारे ३७ लाखांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या अपहारास तत्कालीन संचालक मंडळ जबाबदार असून, यासाठी जिल्हा उपनिबंधकांचे संगनमत अथवा मदत केल्याचा ठपका नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पालक अधिकारी प्रदीप शेवाळे यांनी ठेवला आहे. याबाबत सटाणा पोलीस ठाण्यात तक्र ार करण्यात आली आहे; मात्र अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.जिल्हा बँकेने जिल्ह्यातील अनिष्ठ तफावत, आर्थिक गैरव्यवहार आदी कारणे असलेल्या संस्थांच्या तपासणीसाठी विशेष पथक तयार केले आहे. या पथकाने तालुक्यातील वीरगाव येथील विकास सेवा संस्थेच्या सन १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीतील संस्थेची तपासणी केली. या तपासणी कालावधीत ३७ लाखांचा अपहार झालेला आहे. यामध्ये सभासदांचे कर्ज खाते कर्जमुक्त केल्याचे कागदोपत्री दर्शवित सुमारे ४ लाख १७ हजार ६०० रुपयांचा अपहार केला आहे.संस्थेच्या कीर्द बुकात दर्शविलेल्या अनामत रकमा दप्तरी व्हाउचर न ठेवता रोखीने अदा केल्याचे दर्शवून सुमारे ३ लाख ३८ हजार २५८ रुपयांचा अपहार झाला आहे.सचिव यांना बेकायदेशीररीत्या बोनस व जादा मेहनताना अदा केल्याचे दाखवून सुमारे ३ लाख २० हजारांचा अपहार केला आहे.संस्थेने सन २०१२-२०१३ मध्ये कार्यालयाची इमारत बांधत असताना मंजुरीच्या बाहेर जाऊन बेकायदेशीरपणे एकूण ७ लाख ५६ हजार २८१ इतका जादा खर्च दाखविण्यात आला आहे. संस्थेचे पाच संचालक स्वत: कर्जदार असून, त्यांच्याकडे थकीत कर्ज असताना नियमानुसार त्यांची अनामत रक्कम कर्जखाती जमा न करता अनामत तशीच ठेवून ३ लाख ८७ हजार ९९५ रुपयांचा अपहार केला आहे.संस्थेने वेळोवेळी व्यवस्थापन, झेरॉक्स, स्टेशनरी व सादील खर्च अशा शीर्षकाखाली सुमारे १५ लाख २२ हजार अवास्तव जादा खर्च दाखवून अपहार केला आहे.तत्कालीन जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी २९ नोव्हेंबर २०१७ रोजी फेरलेखापरीक्षण आदेश काढला होता; मात्र फेरलेखापरीक्षण पूर्ण होण्याआधीच विद्यमान जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी दि. २६ जून २०१८ रोजी पुढील आदेश काढून ते रद्द केले आहे. प्रत्यक्षात सहकार कायद्यानुसार एकदा पारित झालेला फेर लेखापरीक्षणाचा आदेश मागे घेण्याची किंवा रद्द करण्याचे अधिकाराच त्यांना नाहीत. यामुळे जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांची संचालक मंडळावर कृपादृष्टी असून, त्यांची प्रत्यक्ष संमती असल्याचे या तक्र ारी अर्जात प्रदीप शेवाळे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकfraudधोकेबाजी