शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

दहा टन कांद्यासह जीवनावश्यक वस्तूंचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 17:51 IST

कळवण : केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारत भारती व श्वास फाउण्डेशन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कळवण शहर व तालुक्यातून वस्तू स्वरूपात मदतीचा ओघ सुरू झाला असून, दहा टन कांद्यासह, साखर, गहू, बाजरी, तांदूळ, बाजरी, तेलडबा आदी किराणा तसेच जीवनावश्यक वस्तू जमा झाल्या आहेत. भारत भारती व श्वास फाउण्डेशनच्या माध्यमातून रेल्वेने या ...

कळवण : केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारत भारती व श्वास फाउण्डेशन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कळवण शहर व तालुक्यातून वस्तू स्वरूपात मदतीचा ओघ सुरू झाला असून, दहा टन कांद्यासह, साखर, गहू, बाजरी, तांदूळ, बाजरी, तेलडबा आदी किराणा तसेच जीवनावश्यक वस्तू जमा झाल्या आहेत. भारत भारती व श्वास फाउण्डेशनच्या माध्यमातून रेल्वेने या वस्तूंची वितरण व्यवस्था करण्याचे नियोजन असल्याचे श्वास फाउण्डेशनचे अध्यक्ष विजय पाळेकर, कार्याध्यक्ष मकरंद वाघ यांनी सांगितले.केरळवासीयांच्या मदतीसाठी भारत भारती या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला असून, श्वास फाउण्डेशनच्या पुढाकारातून कळवणमधून दहा टन कांदा कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती, कांदा व्यापारी असोसिएशन व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी भारत भारतीकडे सुपूर्द केला आहे.शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंबादास जाधव व शहरप्रमुख साहेबराव पगार , विनोद मालपुरे, किशोर पवार यांनी शिवसेनेच्या माध्यमातून भारत भारती व श्वास फाउण्डेशन यांच्याकडे किराणा वस्तूंच्या रूपाने मदत दिली. शिवसेनेने साखर,गहू, तांदूळ, बाजरी, तेलडबा, बेसन आदींसह किराणा वस्तू स्वरूपाची मदत श्वास फाउण्डेशनकडे सुपूर्द केली.कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतकरी बांधवांना भारत भारती, श्वास फाउण्डेशन व बाजार समिती, कांदा व्यापारी यांच्या वतीने आवाहन करण्यात आले. शेतकरी बांधवांनी कांदा लिलाव दरम्यान आवाहनाला प्रतिसाद दिल्यामुळे कळवणमधून दहा टन कांदा जमा झाला. बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, उपसभापती सुनील देवरे, संचालक हेमंत बोरसे, योगेश महाजन, हरिश्चंद्र पगार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, विष्णू बोरसे, भाजपाचे गोविंद कोठावदे, भूषण शिरोडे, कांदा व्यापारी शरद गांगुर्डे, कांदा उत्पादक देवीदास शिंदे, मुन्ना पगार, दीपक वाघ, संतोष पगार, श्रीधर वाघ, दिनकर जाधव व नानाजी मोरे यांनी यावेळी शेतकरी बांधवांकडून कांदा संकलन करून श्वास फाउण्डेशनकडे जमा केला.--------------------केरळ पूरग्रस्तांसाठी कळवण बाजार समिती, कांदा व्यापारी व शेतकरी बांधवांच्या माध्यमातून कांदा व जीवनावश्यक वस्तू भारत भारती व श्वास फाउण्डेशन यांच्याकडे सुपूर्द करताना बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, हरिश्चंद्र पगार, विष्णू बोरसे, राजेंद्र भामरे, योगेश महाजन , हरिश जाधव, विजय पाळेकर, मकरंद वाघ, गोविंद कोठावदे, भूषण शिरोडे आदी. 

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूर