कळवण : कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कळवण (मानूर) येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त निर्माल्य संकलन करण्यात येत आहे.कळवण शहरातील सर्व गणपती मंडळांना पत्र देऊन निर्माल्य एकत्रित गोळा करण्यास सांगून कळवण नगरपंचायतीच्या सहकार्याने स्वयंसेवकांनी प्रत्येक गणेश मंडळाने एकत्रित गोळा केलेले निर्माल्य संकलित केले. ते महाविद्यालयाच्या गांढूळ खत प्रकल्पासाठी वापरून, त्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाणार आहे.हे सेंद्रिय खत महाविद्यालयाच्या परिसरातील झाडांना टाकून वनसंवर्धन केले जाणार आहे. उत्सव काळात होणारे जलप्रदूषण टाळून सेंद्रिय खताच्या माध्यमातून वनसंवर्धन व जलसंवर्धन करण्यात येणार आहे. निर्माल्य संकलनासाठी कळवणचे नगराध्यक्ष मयूर बहिरम, गटनेते व उपनगराध्यक्ष कौतिक पगार व त्यांचे सहकार्य लाभले. स्वयंसेवकांच्या मदतीने निर्माल्य संकलन करण्यात येत आहे.यावेळी याप्रसंगी प्राचार्य डॉ. उषा शिंदे, कार्यक्र म अधिकारी प्रा. एस. एम. पगार, प्रा. एम. व्ही. बोरसे, प्रा. डॉ. बी. एस. पगार, प्रा. एम. बी. घोडके, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. एस.जे. पवार, डॉ. एम.डी. वाघ व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. (०९ कळवण १)
कळवण महाविद्यालयाच्या वतीने निर्माल्य संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 23:11 IST
कळवण : कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कळवण (मानूर) येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त निर्माल्य संकलन करण्यात येत आहे.
कळवण महाविद्यालयाच्या वतीने निर्माल्य संकलन
ठळक मुद्देसेंद्रिय खत तयार केले जाणार आहे.