शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कळवण, सुरगाणा तालुक्यांना पावणेसात कोटी भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 00:43 IST

कळवण : कळवण व सुरगाणा तालुक्याला तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला होता. वादळीवाऱ्यामुळे घरांच्या नुकसानीसह शेती, फळबागा, भाजीपाल्याचे नुकसान झाले होते. त्यानुसार शासनाने आता सुरगाणा तालुक्यातील नुकसानभरपाई पोटी ६ कोटी ६८ लाख २६ हजार रुपये, तर कळवण तालुक्यातील नुकसानभरपाईपोटी १७ लाख ८५ हजार रुपये मंजूर केल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली.

ठळक मुद्देशासनाचा निर्णय : तौक्ते चक्रीवादळामुळे बसला होता फटका

कळवण : कळवण व सुरगाणा तालुक्याला तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला होता. वादळीवाऱ्यामुळे घरांच्या नुकसानीसह शेती, फळबागा, भाजीपाल्याचे नुकसान झाले होते. त्यानुसार शासनाने आता सुरगाणा तालुक्यातील नुकसानभरपाई पोटी ६ कोटी ६८ लाख २६ हजार रुपये, तर कळवण तालुक्यातील नुकसानभरपाईपोटी १७ लाख ८५ हजार रुपये मंजूर केल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली.नितीन पवार यांनी कळवण व सुरगाणा तालुक्यातील नुकसानीचा प्रस्ताव सादर करून प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई देण्याची मागणी केली होती. त्यानुसार कळवण व सुरगाणा तालुक्यासाठी निधी मंजूर झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे कळवण तालुक्यातील ११३ घरांचे नुकसान झाले होते. त्यानुसार भरपाई पोटी १६ लाख ९५ हजार रुपये, तर २ शेतकऱ्यांच्या १.८० हेक्टर क्षेत्रातील आंबा पिकाच्या नुकसानभरपाईपोटी ९० हजार रुपये असे १७ लाख ८५ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. सुरगाणा तालुक्यातील ४२४ घरांचे नुकसान झाले होते. नुकसानभरपाईपोटी शासनाकडून ६३ लाख ६० हजार रुपये निधी मंजूर झाला आहे, तर सुरगाणा तालुक्यातील १२०८ हेक्टर क्षेत्रातील ५,७८४ शेतकऱ्यांच्या आंबा पिकाच्या नुकसानभरपाईपोटी शासनस्तरावरून ६ कोटी ४ लाख ६६ हजार ५१० रुपये नुकसानभरपाई मंजूर करण्यात आल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.लवकरच भरपाईचे वितरणवादळीवाऱ्यामुळे घरांच्या नुकसानीसह शेती, फळबागा, भाजीपाल्याचे नुकसान झाले, अनेक ठिकाणी वादळाने विजेचे खांब उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले होते . एकीकडे कोरोनाने आदिवासी भागात हातपाय पसरले होते, तर दुसरीकडे तोक्ते चक्रीवादळाने अतोनात नुकसान झाल्याने आदिवासी बांधव संकटात सापडला होता. आमदार पवार यांनी शासकीय यंत्रणेसह नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून आदिवासी बांधवांना दिलासा देत नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत लवकरच नुकसानभरपाई पोहोचविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :talukaतालुकाagricultureशेती