शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वडाळागाव परिसरातील समाजमंदिर बनले खंडहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 02:03 IST

इंदिरानगर : वडाळागाव परिसरातील घरकुल योजना लगत असलेले समाजमंदिर देखभालीअभावी खंडहर बनले आहे, याठिकाणी पावसाचे व गटारीचे पाणी साचले असून, घाणीमुळे परिसरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने साथीचे आजार वाढण्याची शक्यता आहे.

इंदिरानगर : (संजय शहाणे) वडाळागाव परिसरातील घरकुल योजना लगत असलेले समाजमंदिर देखभालीअभावी खंडहर बनले आहे, याठिकाणी पावसाचे व गटारीचे पाणी साचले असून, घाणीमुळे परिसरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने साथीचे आजार वाढण्याची शक्यता आहे.वडाळागावात सुमारे १५ हजार लोकांची वस्ती आहे, यामध्ये शेतकरी व हातावर काम करण्याची लोकवस्ती म्हणून ओळखली जाते. वडाळागाव, सादिकनगर, मेहबूबनगर, मुमताजनगर, गुलशननगर, अण्णा भाऊ साठेनगर, सह परिसरात सुमारे ७० टक्के हातावर काम करणारी लोकवस्ती म्हणून ओळखले जाते. सुमारे दहा वर्षांपूर्वी वडाळागावातील घरकुल योजनालगत सुमारे पंधरा लाख रुपये खर्च करून समाजमंदिर बांधण्यात आले. जेणेकरून परिसरातील नागरिकांना लहान-मोठे कार्यक्रम घेता येतील. त्यामुळे नागरिकांना आर्थिक त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली होती. सुमारे दहा वर्षांपासून समाजमंदिराच्या देखभालीअभावी अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. चोरट्यांनी समाजमंदिराला असलेले लोखंडी ग्रील खिडक्या चोरून नेल्या. तसेच शौचालय बाथरूम व खोलीचे ही नुकसान केली आहे. तसेच समाजमंदिरात घाण व पावसाच्या पाण्यामुळे दुर्गंधी निर्माण झाली असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. समाजमंदिरात क्रिकेट आणि मद्यपींचा, गांजा पिणाऱ्यांचा अड्डा बनला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे. लाखो रु पये खर्च करून समाजमंदिराचा सदुपयोग होत नसेल तर समाजमंदिर बांधले कशाला? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.-------------------डासांचा प्रादुर्भावसमाजमंदिरालगत घरकुल योजना सुमारे ७२० कुटुंब वास्तव करीत आहेत. या परिसरात डास, किड्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. तातडीने समाजमंदिराची दुरु स्ती करून संस्थेस देखभालीसाठी द्यावे, अशी मागणी वडाळागाव परिसरातील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक