शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
4
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
5
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
6
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
7
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
8
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
9
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
10
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
11
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
12
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
13
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
14
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
15
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
16
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
17
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
18
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
19
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
20
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

जमिनींच्या धोरणात्मक निर्णयांसाठी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:21 IST

मालेगाव मनपा महासभा : प्रशासकीय कामकाजासाठी प्रभागरचनेच्या प्रस्तावास मान्यता मालेगाव : महापालिकेचा नगररचना विभाग व वकील मॅनेज होत असल्यामुळे मनपाने संपादित केलेल्या जमिनींचे खटले महापालिका न्यायालयात हारत असल्याचा गंभीर आरोप महापौर रशीद शेख यांनी केला आहे. शहरातील मनपाने संपादित केलेल्या विविध जमिनींच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी समिती गठित करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला. प्रशासकीय कामकाजासाठी प्रभाग रचना करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.

मालेगाव मनपा महासभा : प्रशासकीय कामकाजासाठी प्रभागरचनेच्या प्रस्तावास मान्यता

मालेगाव : महापालिकेचा नगररचना विभाग व वकील मॅनेज होत असल्यामुळे मनपाने संपादित केलेल्या जमिनींचे खटले महापालिका न्यायालयात हारत असल्याचा गंभीर आरोप महापौर रशीद शेख यांनी केला आहे. शहरातील मनपाने संपादित केलेल्या विविध जमिनींच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी समिती गठित करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला. प्रशासकीय कामकाजासाठी प्रभाग रचना करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.महापौर रशीद शेख यांच्या अध्यक्षतेखाली व उपायुक्त अंबादास गर्कळ यांच्या उपस्थितीत बुधवारी दोन वेगवेगळ्या विशेष महासभा झाल्या.. पहिल्या महासभेच्या प्रारंभी उपमहापौर सखाराम घोडके यांनी विषयपत्रिकेवर विषय देण्यासाठी प्रशासन टाळाटाळ करते. नगरविकास विभागाकडून वेळेवर अजेंडा दिला जात नाही. जमिनींचा विषय देण्यात आल्यानंतरदेखील स्वतंत्र अजेंडा काढण्यात आला.विषयपत्रिकेवरील विषयासंबंधी परस्पर निर्णय घेतला तर मनपा आयुक्त संगीता धायगुडे या नोटीस बजावतात अशी कबुली नगरसचिव राजेश धसे यांनी सभागृहात दिली. यावर उपमहापौर सखाराम घोडके यांनी महापौर व स्थायी समिती सदस्यांच्या अधिकारांवर प्रशासन गदा आणत असल्याचा आरोप केला. नगरसेवक बुलंद एकबाल यांनी घरकुल योजनेच्या लाभार्थींची पडताळणी करा, अशी मागणी केली. डॉ. खालीद परवेझ यांनी स्वच्छता कर्मचाºयांना कायम करण्याची मागणी केली.नगरसेवक मदन गायकवाड यांनी स्वच्छतेच्या प्रश्नावर अधिकाºयांना धारेवर धरले. यानंतर प्रभागरचनेच्या प्रस्तावाला मान्यता देण्याचा विषय चर्चेला आला. या विषयाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमुखाने मंजुरी दिली. दुसºया विशेष महासभेस पाच मिनिटांनी सुरुवात झाली. विषयपत्रिकेवर महापालिकेने संपादित केलेल्या जमिनींसंदर्भात पाच प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. जमिनींबाबत न्यायालयातील दाव्यांबाबतची स्थिती जाणून घेण्यासाठी महासभेत चर्चा करण्यात आली.बुलंद एकबाल यांनी सर्व्हे क्र. ९४ च्या जमिनींबाबतचे वकील पत्र अजून दिले गेले नाही. महापौर शेख रशीद यांनी प्रशासनाला धारेवर धरत निकाल सांगण्याची जबाबदारी नव्हती का? असा सवाल उपस्थित केला. उपमहापौर घोडके यांनी निकालानंतर प्रशासनाने काय केले. ७५ लाख रुपये देताना कुणाला विचारून दिले असा सवाल उपस्थित केला. यावर दीर्घकाळ चाललेल्या चर्चेनंतर महापौर रशीद शेख यांनी समिती गठित करण्याचा निर्णय घेतला. या समितीत आयुक्त, महापालिकेचे अधिकारी, सर्वपक्षीय सदस्य असणार असल्याचे सांगितले. महासभेच्या चर्चेत नगरसेवकांनी सहभाग घेतला.डॉ. खालीद परवेझ यांनी न्यायालयीन प्रकरणात धोरण ठरविता येते का असे विचारले. यावर नगरसचिव धसे यांनी महापौर धोरणात्मक निर्णय घेऊ शकतात, असे सांगितले. नगरसेवक युनुस ईसा यांनी जमिनींच्या मोबदल्यांबाबत वन टाइम सेटलमेंट केली गेली नाही. महापालिकेचे वकील न्यायालयात हजर राहत नाही. कागदपत्रे समोरच्या पार्टीला दिले जातात. दावे कमकुवत केले जात असल्याचा आरोप केला.