शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षार्थींनी फाडले आयोगाचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:50 IST

नाशिकः एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने कॉलेजरोडवरील प्राचार्य टी. ए. कुलकर्णी सर्कल येथे सरकारविरोधात घोषणाबाजी करीत परीक्षा पूर्वनियोजित वेळेतच घेण्याची मागणी केली. तर पंचवटीतील गणेशवाडी येथे संत ज्ञानेश्वर अभ्यासिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनीही आयोगचे पत्र फाडून सरकारविरोधत निषेध नोंदविला. यासंदर्भात छात्रभारती विद्यार्थी संघटनने प्रशासनाला निवेदन देऊन नियोजित वेळेत परीक्षा घेण्याची मागणी केली.

ठळक मुद्दे निदर्शने : राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

नाशिकः एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने कॉलेजरोडवरील प्राचार्य टी. ए. कुलकर्णी सर्कल येथे सरकारविरोधात घोषणाबाजी करीत परीक्षा पूर्वनियोजित वेळेतच घेण्याची मागणी केली. तर पंचवटीतील गणेशवाडी येथे संत ज्ञानेश्वर अभ्यासिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनीही आयोगचे पत्र फाडून सरकारविरोधत निषेध नोंदविला. यासंदर्भात छात्रभारती विद्यार्थी संघटनने प्रशासनाला निवेदन देऊन नियोजित वेळेत परीक्षा घेण्याची मागणी केली.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुरुवारी (दि.११) राज्यात कोरोणाचा प्रभाव वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध आल्याने परिपत्रक काढून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केल्याने नाशिकमधील विद्यार्थ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्य टी . ए. कुलकर्णी चौकात सरकारविरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन करीत पूर्वनियोजित वेळेतच परीक्षा घेण्यची मागणी केली.

यावेळी अभाविपच्या आंदोलकांनी चौकात अचानक आंदोलन केल्याने या भागातील वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुरुवारी परिपत्रक काढून राज्यात कोरोणाचा प्रभाव वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध आल्याचे नमूद करीत आता परीक्षा घेणे योग्य नाही असे पत्र पुनर्वसन विभागाचे १० मार्चला पत्र मिळाल्याचे नमूद करीत १४ मार्चला होणारी परीक्षा पुढे ढकलल्याचे स्पष्ट होते.

हे पत्र फाडून गणेशवाडीतील संत ज्ञानेश्वर अभ्यासिकेत परीक्षार्थी सरकार व आयोगाविरोधात निषेध नोंदविला. परीक्षेची तयारी पूर्ण झालेली असताना परीक्षा अचानक पुढे ढकलल्याने शांततेच्या मार्गाने निषेध नोंदविण्यासाठी हे पत्र पाडल्याचे विद्यार्थी प्रतिनिधींनी सांगितले. दरम्यान वारंवार परिक्षा पुढे ढकलली जात असल्याने एमपीएसची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.परीक्षार्थींमध्ये असंतोषवारंवार परिक्षा पुढे ढकलली जात असल्याने एमपीएसची परिक्षा देणाऱ्या परीक्षार्थींमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे नमूद करीत छात्रभारती विद्यार्थी संघटनेने सरकारवाडा ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांना निवेदन दिले. छात्रभारतीचे प्रतिनिधीमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात हे निवेदन देण्यासाठी जात होते.मा जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी अनुपस्थित असल्याने छात्रभारतीच्या प्रतिनिधीमंडळाने याच परिसरात हेमंत सोमवंशी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थी