शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कमिशन कपातीने रोजगारांवर कुºहाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 00:48 IST

अल्पबचत व महिलाप्रधान प्रतिनिधींच्या कमिशनमध्ये केंद्र सरकाने ५० टक्के कपात केली असून, या माध्यमातून सरकारने अल्पबचत प्रतिनिधींच्या रोजगारावरच कुºहाड घातल्याचा आरोप अखिल भारतीय अल्पबचत प्रतिनिधी संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष गिरीश जोशी यांनी केला आहे.

नाशिक : अल्पबचत व महिलाप्रधान प्रतिनिधींच्या कमिशनमध्ये केंद्र सरकाने ५० टक्के कपात केली असून, या माध्यमातून सरकारने अल्पबचत प्रतिनिधींच्या रोजगारावरच कुºहाड घातल्याचा आरोप अखिल भारतीय अल्पबचत प्रतिनिधी संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष गिरीश जोशी यांनी केला आहे.  गोळे कॉलनीतील काकासाहेब गद्रे मंगल कार्यालयात जिल्ह्यातील अल्पबचत व महिलाप्रधान प्रतिनिधींच्या झालेल्या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर अल्पबचत प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य महासंघाचे अध्यक्ष पी. जी. कुलकर्णी, नीलम उंडे आदी उपस्थित होते. जोशी म्हणाले की, अल्पबचत प्रतिनिधींना भरण्यासाठी जमा केलेल्या रकमेच्या १ टक्का कमिशन मिळते; परंतु केंद्र सरकाने यात ०.५ टक्के कपात करण्याचा घाट घातल्याने प्रतिनिधींचे उत्पन्न ५० टक्क्यांनी घटणार असून, त्यांच्या रोजगारावर कुºहाड कोसळणार आहे. अल्पबचत प्रतिनिधी देशभरातून १६५ हजार कोटी रुपये जमा करून पोस्टाला देत असतात. तरीही या प्रतिनिधींकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याची खंत जोशी यांनी यावेळी व्यक्त केली.  नाशिकमध्ये दोन हजार प्रतिनिधींना सरकारच्या या निर्णयाचा फटका बसणार आहे. यामुळे या सर्व प्रतिनिधींनी एकत्र येऊन सरकार विरोधात लढा पुकारण्याचे आवाहनही जोशी यांनी केले, तर मिलिंद साने यांनी नवे प्रतिनिधी परवाने मिळत नसल्याने जुने परवाने रद्द होऊ न देण्याचा सल्ला दिला. पी. जी. कुलकणऱ्ी यांनी सरकारच्या धोरणाविरोधात प्रतिनिधींनी संघटित होण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक नीलम उंडे यांनी केले.दिल्लीत देशव्यापी आंदोलनअल्पबचत प्रतिनिधींच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आॅक्टोबर महिन्यात दिल्लीत देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये अशाप्रकारे सभा घेऊन प्रतिनिधींची जागृती करण्यात येत आहे; मात्र सरकारला वेळीच जाग आली नाही, तर दिल्लीतील देशव्यापी आंदोलनानंतर प्रतिनिधी कामबंद आंदोलन करून सामूहिक राजीनामे देतील, असा इशाराही गिरीश जोशी यांनी यावेळी दिला.