शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी मेळाव्यात राज्य शासनावर टीका

By admin | Updated: August 7, 2016 23:59 IST

अनिल कदम : पीक कर्जाबाबत निर्णय न झाल्यास जिल्हा बँकेवर मोर्चा

निफाड : पीककर्ज वितरणाबाबत जिल्हा बँकेने मंगळवारपर्यंत निर्णय न घेतल्यास बुधवारी जिल्हा बँकेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आमदार अनिल कदम यांनी निफाड येथे दिला.नाशिक जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना पीककर्ज देणे एक महिन्यापासून बंद केले आहे़ त्यामुळे पुरेसा पाऊस होऊनही शेतकऱ्यांना पीक संगोपनासाठी पीककर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. याबाबत शेतकऱ्यांच्या व्यथा आणि पुढील दिशा ठरविण्यासाठी निफाड येथे मार्केट कमिटी सभागृहात रविवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात आमदार कदम अध्यक्षस्थानावरून बोलत होते. नाबार्ड, जिल्हा बँक, विकास सेवा संस्था अशा त्रिसूत्रीने शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा होतो. अधिवेशनात नाबार्डने जिल्हा बँकेला कर्ज वितरणासंर्दभात कोणताही निर्णय घेतला नाही, त्यामुळे जिल्हा बँक उद्दिष्टांच्या पुढे कर्जपुरवठा करण्यास हतबल झाली आहे. नियमित व पूर्ण कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळणे बंद झाल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडकळीस आला आहे. कर्ज वितरणाबाबत मंगळवारपर्यंत जिल्हा बँकेने निर्णय न घेतल्यास बुधवारी शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आमदार कदम यांनी मेळाव्याप्रसंगी दिला.याप्रसंगी व्यासपीठावर लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, उपसभापती सुभाष कराड, संचालक राजेंद्र डोखळे, पंढरीनाथ थोरे, बाळासाहेब क्षीरसागर, पिंपळगाव बाजर समितीचे संचालक भास्करराव बनकर, चिंतामण सोनवणे, रमेशचंद्र घुगे, संपतराव डुंबरे, भगीरथ शिंदे, शंकरराव कोल्हे, तुकाराम सातभाई, रामकृष्ण दराडे, शिवाजी तासकर, एस. आर. शिंदे, जानकीराम धारराव आदि मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविकात राजेंद्र डोखळे यांनी आता गोड वाटणारी नियमनमुक्ती कडवट असल्याचे भविष्यात जाणवेल, अशी भीती व्यक्त केली. यावेळी भास्करराव बनकर, पंढरीनाथ थोरे यांनी सरकारच्या नियमनमुक्तीवर टीका केली. शेतकऱ्यांच्या वतीने जानकीराम धारराव, भीमराव काळे, भगीरथ शिंदे, एस. आर. शिंदे यांनीही भाजपा सरकार शेतकरीविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप केला. (वार्ताहर)