शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मनपातील टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 00:26 IST

नाशिक : महापालिकेत गाजत असलेल्या देवळाली शिवारातील सर्व्हे क्रमांक २९५ मधील शंभर कोटींच्या टीडीआर घोटाळ्यासह अन्य प्रकरणांच्या चौकशीला अखेरीस बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त चौकशी समितीची पहिली बैठक पार पडली. यात मुद्रांक महानिरीक्षकांना पत्र पाठवून दराची पडताळणी करण्याचा करण्याचे पहिल्या बैठकीत ठरवण्यात आले.

ठळक मुद्देमहापालिकेत वेळावेळी देण्यात आलेले टीडीआर घोटाळे वादग्रस्त ठरले

नाशिक : महापालिकेत गाजत असलेल्या देवळाली शिवारातील सर्व्हे क्रमांक २९५ मधील शंभर कोटींच्या टीडीआर घोटाळ्यासह अन्य प्रकरणांच्या चौकशीला अखेरीस बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त चौकशी समितीची पहिली बैठक पार पडली. यात मुद्रांक महानिरीक्षकांना पत्र पाठवून दराची पडताळणी करण्याचा करण्याचे पहिल्या बैठकीत ठरवण्यात आले.महापालिकेत वेळावेळी देण्यात आलेले टीडीआर घोटाळे वादग्रस्त ठरले आहेत. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांपासून देवळाली शिवारातील सर्व्हे नंबर २९५/१ मधील भूखंडाच्या बदल्यात शंभर कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. शाळा, खेळाचे मैदानाचे आरक्षण होते. सदरचा भुखंड सिन्नर फाटा येथे असताना नाशिकरोड येथील बिटको चौक ते उड्डाणपुलापर्यंत जागा दाखवून या जागेसाठी असलेला रेडीरेकनर वसूल करण्यात आला आहे. म्हणजेच सरकारी बाजार भाव ६ हजार ९०० रुपये प्रति चौरस मीटर असताना प्रत्यक्षात टीडीआर देताना २५ हजार १०० प्रति चौरस मीटर दशर्वून टीडीआर देण्यात आला. त्यामुळे या प्रकरणात महापालिकेचे शंभर कोटी रुपयांचे नुकसान झाले अशी तक्रार आहे, तर दुसरीकडे २००९ ते २०१२ यादरम्यान देवळाली व मौजे नाशिक शिवार तसेच राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन करण्याच्या ११ प्रस्ताव असून, त्यात रेल्वे विभागासाठी आरक्षित भूखंडाचे भूसंपादन करण्याची जबाबदारी नसतानाही महापालिकेने त्यासाठी मोबदला दिला, असा गंभीर आरोप शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी केला आहे. या संदर्भात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेला चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर आयुक्तांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे. या समितीने शहर विकास आराखड्यातील तीन भूखंडांची माहिती घेतली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcommissionerआयुक्त