विंचूर : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीस प्रारंभ झाला असल्याने मंदिर निर्माण समर्पण अभियानाची विंचूर येथे मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. येथील श्रीराम मंदिरात कार्यक्रम घेण्यात आला. भारतमाता आश्रमाचे जिग्नेश्वर महाराज, भास्करराव परदेशी, दत्तात्रय व्यवहारे, राजेंद्र पारीक, दत्तात्रय शिरसाठ, जोशी यांसह उपस्थितांच्या हस्ते महाआरती करून या अभियानाची सुरुवात करण्यात आली.प्रारंभी श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भास्कर परदेशी यांनी धनादेश श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या ट्रस्टच्या नावाने सुपुर्द करून अभियानास प्रारंभ केला. येथून जवळच असलेल्या हनुमाननगर येथेही श्रीराम मंदिर निधी संकलन व समर्पण अभियानास गोरक्षनाथ कडलग, किशोर दरेकर, कोल्हे, नितीन सालगुडे यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.
विंचूरला श्री रामजन्मभूमी निधी संकलनास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 18:56 IST
विंचूर : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीस प्रारंभ झाला असल्याने मंदिर निर्माण समर्पण अभियानाची विंचूर येथे मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. येथील श्रीराम मंदिरात कार्यक्रम घेण्यात आला. भारतमाता आश्रमाचे जिग्नेश्वर महाराज, भास्करराव परदेशी, दत्तात्रय व्यवहारे, राजेंद्र पारीक, दत्तात्रय शिरसाठ, जोशी यांसह उपस्थितांच्या हस्ते महाआरती करून या अभियानाची सुरुवात करण्यात आली.
विंचूरला श्री रामजन्मभूमी निधी संकलनास प्रारंभ
ठळक मुद्देमहाआरती करून या अभियानाची सुरुवात