शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये थेट सीएनजी वाहिनी येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:57 IST

नाशिक : पारंपरिक इंधनाला पर्याय असलेली सीएनजी गॅसची थेट वाहिनी जव्हारपासून नाशिक शहरात आणण्यात येणार असून, त्यामुळे मोठा स्वस्त ...

नाशिक : पारंपरिक इंधनाला पर्याय असलेली सीएनजी गॅसची थेट वाहिनी जव्हारपासून नाशिक शहरात आणण्यात येणार असून, त्यामुळे मोठा स्वस्त आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे सीएनजी नाशिकमध्ये सुरू व्हावे यासाठी महापालिकादेखील या कंपनीस सहकार्य करीत आहेत.पेट्रोल आणि डिझेल दराच्या तुलनेत स्वस्त आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी नागरिकांची मागणी आहे. माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिल्ली येथे यासंदर्भात प्रयत्न करताना नाशिकमध्ये सीएनजीचे पंप उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला होता; परंतु उपयोग झाला नव्हता. दरम्यान, आता नाशिक महापालिकेच्या वतीने शहर बससेवा सुरू करण्यात येणार असून, त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार दोनशे बस इलेक्ट्रिकल तर दोनशे सीएनजीवर चालणाऱ्या असणार आहेत. त्यामुळे महापालिकेने खासगी कंपनीलादेखील बळ दिले आहे. जव्हार येथून पाइपद्वारे सीएनजी गॅस आणला जाणार असून, नाशिकमध्ये प्रक्रिया करून तो वाहनांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.यासंदर्भात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या सूचनेनुसार प्रशासनाने संबंधित कंपनीच्या अधिकाºयांबरोबरच सर्व्हे केला असून, प्रक्रियेसाठी कंपनीने सुमारे तीन ते चार एकर जागेची मागणी केली असून, तीदेखील भाड्याने देण्याबाबत तयारी सुरू असल्याचे वृत्त आहे. पर्यावरणास उपयुक्त आणि पेट्रोल-डिझेलच्या दराच्या तुलनेत अत्यल्प दर अशाप्रकारचे इंधन नाशिककरांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक