शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महिला लाभार्थीने केली शौचालयाला रंगरंगोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 00:50 IST

कळवण : जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून कळवण तालुक्यातील मेहदर येथील लाभार्थी श्रीमती पद्मा देवीदास आंबेकर यांनी आपल्या शौचालयाची रंगरंगोटी करून खऱ्या अर्थाने शौचालय दिन साजरा केला आहे .

कळवण : जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून कळवण तालुक्यातील मेहदर येथील लाभार्थी श्रीमती पद्मा देवीदास आंबेकर यांनी आपल्या शौचालयाची रंगरंगोटी करून खऱ्या अर्थाने शौचालय दिन साजरा केला आहे . स्वच्छतेच्या अनुषंगाने यावर्षीही जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक, वैयक्तिक, शाळा-अंगणवाडीच्या शौचालयासंदर्भात दि. १७ ते २७ नोव्हेंबर कालावधीत विशेष अभियान राबविण्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी श्रीमती लीना बनसोड यांनी आदेशित केले आहे.  कळवण तालुक्यातील सर्व शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायतीमध्ये या कालावधीत स्वच्छतेच्या अनुषंगाने कार्यक्रम होत आहेत. मेहदर येथील महिला लाभार्थी पद्मा आंबेकर यांनी २०१७ साली शौचालयाचे बांधकाम केले. शौचालय हेच खरे इज्जत घर असल्याची प्रतिक्रिया त्यांनी जागतिक शौचालयदिनी दिली. मेहदर ग्रामपंचायत अंतर्गत १६५ कुटुंबे असून, मेहदर गाव हागणदारीमुक्त आहे. गावाची वाटचाल आदर्श गावाकडे होत असल्याची प्रतिक्रिया ग्रामसेवक वैशाली देवरे व कळवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी.एम. बहिरम यांनी दिली.----------------सॅनिटरी नॅपकिन मशीनग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ह्यसॅनिटरी नॅपकिनह्णला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र त्याची उपलब्धता आणि किमतींमुळे ते आदिवासी भागातील महिलांच्या आवाक्याबाहेर आहेत. नॅपकिन वापरून शकणाऱ्या ८० टक्के महिलांमध्ये न परवडणाऱ्यांचीच संख्या अधिक आहे. ही बाब लक्षात घेऊनच मेहदर ग्रामपंचायतीने २ वर्षापूर्वी सॅनिटरी नॅपकिन मशीन बसविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र वापरलेल्या पॅडचे व्यवस्थापन करणेही गरजेचे असल्याने त्याचेही व्यवस्थापन केले. त्यामुळे महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीचे औचित्य साधून हा उपक्रम राबविल्याबद्दल ग्रामसेविका वैशाली देवरे व सरपंच संगीता बागुल यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे तसेच यासोबत एक शोषखड्डा असलेल्या लाभार्थींनी दोन खड्ड्यात शौचालयाचे रूपांतर केल्याने त्यांचे सन्मान भेट व प्रमाणपत्र देत गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.-----------------ग्रामसेवक श्रीमती देवरे यांनी मला शौचालय बांधण्यासाठी प्रेरित केले. शौचालय बांधून त्याचा नियमित वापर केल्यानंतर त्याचे महत्त्व कळाले. शौचालयाचा नियमित वापर केल्याने आरोग्याच्या समस्या भेडसावत नाही. मी व माझे कुटुंब नियमित शौचालयाचा वापर करतो.- पद्मा आंबेकर, मेहदर

टॅग्स :Nashikनाशिक