शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
2
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
3
'या'साठी रशियासोबत भागीदारी करण्याच्या तयारीत भारत, चीनला झटका देणार; अवलंबित्व कमी करणार
4
सणासुदीच्या दिवसांत दोन अपघात; नंदुरबारमध्ये सात भाविकांचा बळी, समृद्धीवर म्यानमारच्या नागरिकांचा अपघाती अंत
5
"मोठे नेते गैरसमजातून बोलले, पण इतकी वर्षे..."; भुजबळांच्या शाब्दिक हल्ल्यानंतर विखे-पाटलांचे स्पष्टीकरण
6
केवळ ५ वर्षांत ३५ लाख रुपयांचा फंड; पैशांचा पाऊस पाडणारी ही पोस्टाची स्कीम कोणती? जाणून घ्या
7
Radhika Yadav : "आत्मसन्मानाला ठेच, मी माझ्या मुलीची हत्या केली..."; टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांची कबुली
8
कुंडली न जुळवता लग्न केलं तर होऊ शकते हत्या; बनारस हिंदू विद्यापीठाचे धक्कादायक संशोधन, काय म्हटलंय?
9
Mumbai Fire: मालाडमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग; आकाशात दिसले धुराचे लोट, परिसरात भीतीचे वातावरण
10
‘महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ मंत्री ,२ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची जबाबदारी त्यांची’, विजय वडेट्टीवार यांनी सुनावले
11
हॉटेलचा बेड पाहूनच ग्राहकाची झोप उडाली! असं काय पाहिलं की, मालकाला १ लाखांचा दंड द्यावा लागला? 
12
Diwali Special Recipe: गॅसचा वापर न करता, घरच्या साहित्यात करा हलवाईसारखी रुचकर मिठाई
13
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
14
३ महिन्यांमध्ये १००० कोटी रुपयांचा फायदा; चांदीच्या किमतीनं 'यांना' केलं मालामाल
15
Happy Diwali 2025 Wishes: दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा दीपावलीचा सण!
16
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
17
परळच्या फ्लॅटमध्ये व्यापाऱ्याला केलं 'टॉर्चर'; जुन्या वादातून अपहरण करुन ७६ लाखांची वसूली, महिलेचाही सहभाग
18
जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने केला महिलेवर ॲसिड हल्ला, तीन महिन्यांपूर्वी दाखल केला होता गुन्हा
19
Diwali 2025: या दिवाळीत स्वतःला द्या एक छोटासा ब्रेक; तुमचे टॅरो कार्ड काय सांगते पहा!
20
भयंकर घटना! घरात झोपलेल्या तरुणाचा अज्ञात व्यक्तीने कापला प्रायव्हेट पार्ट; कुटुंब आणि गावकरी हादरले

रंगकर्मी राज्य नाट्य स्पर्धेसाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:32 IST

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचलनालय यांच्यातर्फे आयोजित राज्य नाट्य स्पर्धेअंतर्गत प्राथमिक फेरीचे सोमवार (दि. ६) नोव्हेंबरपासून आयोजन करण्यात आले आहे. नाशिक विभागानेदेखील या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला असून, परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे या स्पर्धा संपन्न होणार आहेत.

नाशिक : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचलनालय यांच्यातर्फे आयोजित राज्य नाट्य स्पर्धेअंतर्गत प्राथमिक फेरीचे सोमवार (दि. ६) नोव्हेंबरपासून आयोजन करण्यात आले आहे. नाशिक विभागानेदेखील या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला असून, परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे या स्पर्धा संपन्न होणार आहेत.  नाशिक विभागातून या स्पर्धेसाठी २१ नाट्यप्रयोग सादर होणार असून, विविध संघांची स्पर्धेच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू आहे. दिवाळीचा सण संपल्यानंतर कलाकार, नाट्यलेखकांसह संपूर्ण रंगकर्मींच्या तयारीने जोर धरला आहे. हौशी रंगकर्मी या स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट  कलेचे सादरीकरण करणार आहेत. आॅफिस आणि कार्यालयीन कामकाज सांभाळून कलावंत स्पर्धेसाठी तयारी करत आहेत. रोज साधारणत: तीन ते चार तास किंवा शनिवारी किंवा रविवारी अधिकाधिक वेळ देत स्पर्धेच्या दृष्टीने संहितावाचन, अभिनय सराव यांसह वेशभूषेवरदेखील कलाकार विशेष लक्ष देत आहेत.नाट्यकर्मींसाठी पर्वणी असलेल्या या स्पर्धेतून अनेक चुरशीचे प्रयोग बघायला मिळणार आहेत. नवीन कलावंतांसाठी व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाणाºया या स्पर्धेत सगळ्याच रंगकर्मींची तयारी सुरू आहे. या राज्य नाट्य स्पर्धेचा शुभारंभ विजय नाट्य मंडळाच्या ‘हे रंग जीवनाचे’ या लेखक दिग्दर्शक नेताजी भोईर यांच्या नाटकाने होणार आहे.या स्पर्धेअंतर्गत मंगळवारी (दि. ७) विच्छा माझी पुरी करा, बुधवार (दि. ८) रक्तबीज, गुरुवार (दि. ९) ‘सतम तारा’, शुक्रवार (दि. १०) श्यामची आई, शनिवार (दि. ११) आणि धम्म, रविवार (दि. १२) सती न गेलेली महासती, सोमवार (दि. १३) पोशा, मंगळवार (दि. १४) प्रयास, बुधवार (दि. १५) एडिपस रेक्स, गुरुवार (दि. १६) वंशभेद, शुक्रवार (दि. १७) तितिक्षा, शनिवार (दि. १८) ये मामला गडबड हंै, सोमवार (दि. २०) ती रात्र, मंगळवार (दि. २१) अ‍ॅनिमल प्लानेट, बुधवार (दि. २२) नाव झालं पाहिजे, गुरुवार (दि. २३) छक्के पंजे, शुक्रवार (दि. २४) एक्झिट, तर मून विदाउट स्काय, शनिवारी (दि. २५) उत्तरदायित्व आणि चाहूल हे प्रयोग सादर होणार असून, या स्पर्धेसाठी नाट्यप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.