शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात महाविद्यालयीन युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 16:24 IST

देवळा : तालुक्यात भावडबारी घाटाच्या पायथ्याशी हिरो स्कुटीला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे भऊर ( ता. देवळा ) येथील रोशन दयाराम पवार (१९) हा महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला.

देवळा : तालुक्यात भावडबारी घाटाच्या पायथ्याशी हिरो स्कुटीला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे भऊर ( ता. देवळा ) येथील रोशन दयाराम पवार (१९) हा महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवळा शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर विंचूर प्रकाशा मार्गावर भावड घाटाच्या पायथ्याशी असलेल्या एस.के. डी. इंग्लिश मिडीअम स्कुल जवळ बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. रोशन दयाराम पवार हा देवळा येथून आपल्या हिरो मेस्ट्रो स्कुटीने (क्र . एमएच ४१, आरके ५२१६) नासिक येथे जात असतांना भावड घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वळण रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे चाकाखाली सापडून डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच ठार झाला. रोशनला त्वरीत देवळा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. ग्रामीण रु ग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. रोशनची आई रंजना पवार व वडील दयाराम नारायण पवार हे दोघेही अनुक्र मे मंगरूळ, व भाटगाव ( ता. चांदवड ) येथे प्राथमिक शिक्षक आहेत.रोशनने नुकतीच बारावीची परीक्षा दिली असून पुढील एन्ट्स परीक्षांची तयारी करण्याच्या उद्देशाने तो क्लास लावण्यासाठी नासिक येथे जात होता. एक हुषार विद्यार्थी म्हणून त्याचे नाव होते. त्याच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. त्याच्या अकाली मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. देवळा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अज्ञात वाहनाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक