शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

विवाहपूर्व समुपदेशनाची महाविद्यालयीन तरूणाईला गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 17:37 IST

मालेगाव : अगदी किरकोळ कारण व विशेषत: इगो प्रॉब्लेममुळे वैवाहिक तसेच कौटुंबिक कलहाचे वाद थेट न्यायालयात पोहोचत आहेत.

मालेगाव : अगदी किरकोळ कारण व विशेषत: इगो प्रॉब्लेममुळे वैवाहिक तसेच कौटुंबिक कलहाचे वाद थेट न्यायालयात पोहोचत आहेत. महिला कौटुंबिक कलह प्रकरणांचा आलेख तर दिवसागणिक वाढतो आहे. मालेगावच्या महिला समुपदेशन केंद्रात गेल्या सहा वर्षात ४३०० प्रकरणे दाखल झाली आहेत. वादा नंतरच्या समुपदेशनाथ तडजोड होवून २७०० दाम्पत्यांच्या रेशीमगाठी जुळवून आणण्यात येथील केंद्राला यश आले आहे. असे असले तरी भविष्यात वैवाहिक कलहाचे प्रसंग उद्भवू नये यासाठी महाविद्यालयीन तरूणाईला विवाहपूर्व समुपदेशनाची गरज निर्माण झाली आहे.गेल्या काही वर्षांपासून कुटुंब कलहाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. छोट्या-छोट्या गोष्टींचे रूपांतर भांडणात होत आहे. सोशल मिडियाच्या अति वापरामुळे देखील पती-पत्नी वाद होण्याचे प्रकार वाढले आहेत. एकत्रित कुटुंब व्यवस्था मोडकळीस आल्यामुळे कलहाचे प्रकार दिवसागणिक वाढत आहेत. महिलांच्या बाजूने सक्षम कायदे असले तरी छळाचे व तक्रारींचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. शासन पातळीवरुन समुपदेशनासारख्या उपाययोजना केल्या जात आहे. तरी देखील इगो प्रॉब्लेममुळे छोट्या-छोट्या गोष्टींचा वाद थेट न्यायालय व पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचत आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये विवाहपूर्व समुपदेशन केंद्राची गरज निर्माण झाल्याचे जाणकारांचे मत आहे.

टॅग्स :Schoolशाळा