शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांचे पाकीट हरवले, कुणाला नाही सापडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:13 IST

लग्नसोहळ्यातून मौल्यवान वस्तू चाेरीला जाण्याच्या घटना नाशिककरांना नवीन नाहीत. मात्र, एका बड्या राजकीय व्यक्तीच्या लग्न सोहळ्यात पोहोचल्यानंतर जिल्हाधिकारी मांढरे ...

लग्नसोहळ्यातून मौल्यवान वस्तू चाेरीला जाण्याच्या घटना नाशिककरांना नवीन नाहीत. मात्र, एका बड्या राजकीय व्यक्तीच्या लग्न सोहळ्यात पोहोचल्यानंतर जिल्हाधिकारी मांढरे यांना त्यांचे पाकीट खिशात नसल्याचे लक्षात आले आणि सुरक्षारक्षक व पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली. मांढरे यांचे पाकीट त्यांच्याकडून नेमके कोठे गहाळ झाले की, कोणी चोरट्याने ते त्यांची नजर चुकवून चोरी केले, याविषयी साशंकता कायम आहे. मात्र, शहरात याबाबत रात्री उशिरापर्यंत चर्चा रंगली होती. जिल्हाधिकाऱ्यांचे पाकीट हरवले अन‌् कोणाला नाही सापडले, अशीच अवस्था झाल्याने आश्चर्य व्यक्त होत होते.

रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार संभाजीराजे भोसले यांसारखे मान्यवर नाशिक शहराच्या दौऱ्यावर आले होते. पवार यांनी शासकीय अधिकारी वर्गासोबत गंगापूर धरणालगत असलेल्या ‘ग्रेप पार्क रिसॉर्ट’ येथे आढावा बैठकही बोलाविली होती. या बैठकीला पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. बैठक आटोपून अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह सर्वच वरिष्ठ शासकीय अधिकारी गंगापूर रोडवरील एका लॉन्समध्ये आयोजित लोकप्रतिनिधींच्या कुटुंबातील लग्नसोहळ्याला हजर राहिले. यावेळी नववधु-वराला आशीर्वाद अन‌् शुभेच्छा दिल्यानंतर, मांढरे यांनी आपला खिसा तपासला असता, त्यांना पाकीट नसल्याचे लक्षात आले. यामुळे पाकीट नेमके गेले कोठे? असा प्रश्न त्यांना पडला. यानंतर, शोधाशोधही झाली. मात्र, पाकीट काही कुणाला सापडले नाही.

दरम्यान, मांढरे यांच्याशी या प्रकरणी संपर्क साधला असता, त्यांनी मी आज अनेक ठिकाणी गेलो होतो, त्यामुळे पाकीट नेमके कोठे गहाळ झाले, याबाबत निश्चितपणे सांगता येणार नाही, असे सांगितले.