शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांकडून सिन्नरला मिठाईचे दुकान सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 01:04 IST

सिन्नर शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्वत: शहरातील रस्त्यावर फिरुन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली. मिठाई दुकानात नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आल्यानंतर सदर दुकान तत्काळ सील करण्यात  आले.

सिन्नर : शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्वत: शहरातील रस्त्यावर फिरुन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली. मिठाई दुकानात नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आल्यानंतर सदर दुकान तत्काळ सील करण्यात आले.जिल्हाधिकारी मांढरे यांनी मंगळवारी दुपारी तीन वाजता तहसील कार्यालयात प्रशासकीय अधिकाऱ्यां सोबत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. शहरात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन होते की नाही याबाबत पोलीस व नगर परिषद प्रशासन यांनी संयुक्तपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना मांढरे यांनी दिल्या. ग्रामीण भागात गटविकास अधिकारी व पोलिसांनी संयुक्तपणे यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. काेरोनाचे एकूण रुग्ण व गृह विलगीकरण असलेल्या रुणांचा त्यांनी आढावा घेतला.  यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सिन्नर शहरात फिरुन पाहणी केली. शहरातील गंगावेस भागापासून ते सिन्नर बस स्थानकापर्यंत पायी फिरुन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीची तपासणी केली. 

टॅग्स :Nashikनाशिकcollectorजिल्हाधिकारीcorona virusकोरोना वायरस बातम्या