शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावला जिल्हाधिकारी, नाशिकसाठी आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 23:46 IST

नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मालेगावमधील परिस्थितीवर जिल्हाधिकारी, नाशिक शहरावर महापालिका आयुक्त तर जिल्ह्यातील ग्रामीण भागावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष केंद्रित करून समन्वयकाची भूमिका पार पाडावी, अशा सूचना गुरूवारी (दि.७) पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मालेगावमधील परिस्थितीवर जिल्हाधिकारी, नाशिक शहरावर महापालिका आयुक्त तर जिल्ह्यातील ग्रामीण भागावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष केंद्रित करून समन्वयकाची भूमिका पार पाडावी, अशा सूचना गुरूवारी (दि.७) पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत भुजबळ बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नाशिक शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, सहायक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आरोग्य उपसंचालक पठ्ठणकोट शेट्टी, जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश जगदाळे आदी उपस्थित होते.यावेळी भुजबळ म्हणाले, सुरुवातीला आपल्या जिल्ह्यात एकही कोरोना संसर्गित नव्हता, आज तो सर्वदूर पसरला आहे. शहरी भागातील संसर्ग आज तालुकास्तरावर ग्रामीण भागातही जाऊन पोहोचला आहे. अशा परिस्थितीत जिल्हास्तरीय यंत्रणा व तालुकास्तरीय यंत्रणांनी आपसातील समन्वय बळकट करणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रलंबित स्वॅब नमुन्यांचे अहवाल तत्काळ लवकरात लवकर मागवून पॉझिटिव्ह रुग्णांवर तत्काळ इलाज कसे करता येतील यासाठीचे नियोजन करणे गरजेचे आहे. मालेगावपाठोपाठ आता जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. मालेगावसह येवल्याची रुग्ण संख्या चिंतेचा विषय असून, तेथे एका वरिष्ठ अधिकाºयाची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात यावी. महिला, मुली, लहान बालके त्यांच्यासोबतच आहेत. ते जात असतील तर त्यांना जाऊ द्यावे. ज्यांना निवारागृहांमध्ये राहायचे आहे त्यांना थांबू द्यावे. त्यांच्याशी मानवतेच्या भावनेतून प्रशासन व जनतेने व्यवहार करावेत, असे आवाहनही यावेळी मंत्री भुजबळ यांनी केले.---------अधिकारी कामकाजावर लक्ष ठेवूनविभागीय आयुक्त राजाराम माने यांनी सांगितले की, कालच जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यात मालेगावसाठी समन्वयाची जबाबदारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नाशिक शहरासाठी महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे व नाशिक ग्रामीणची जबाबदारी ही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. हे सर्व अधिकारी पूर्वीपासूनच दररोज या क्षेत्रातील कामकाजाकडे लक्ष ठेवून आहेत, तसेच प्रत्यक्ष त्या भागांत भेटी देऊन उपाययोजना करत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक