शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सर्वाधिक थंडी

By admin | Updated: November 2, 2016 23:23 IST

राज्यात सर्वाधिक थंडी

नाशिक : राज्यातील सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरपेक्षाही नाशिक अधिक थंड झाले आहे. बुधवारी (दि. २) नाशिक चे किमान तपमान १०.५ अंश इतके नोंदविले गेले.यावर्षी नाशिक जिल्ह्णात थंडीने दमदार आगमन केले आहे. मंगळवारी (दि.१) नाशिकचे किमान तपमान १३.७ अंशावर होते; मात्र एका दिवसात पारा अचानकपणे घसरून थेट तीन अंशांनी कमी झाल्याने बुधवारी सकाळी किमान तपमान १०.५ इतके असल्याची नोंद हवामान खात्याने केली. यामुळे राज्यातील नाशिक हे सध्या सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण बनले आहे. नाशिकचा पारा सातत्याने घसरू लागल्याने यावर्षी नाशिककरांना हुडहुडी भरणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला जात आहे. बुधवारी शहरात पहाटे मोठ्या प्रमाणावर थंडी होती, तसेच संध्याकाळी सात वाजेपासून थंडीचा कडाका जाणवू लागल्याने गोदाकाठी वास्तव्यास असलेल्या भटक्यांनी शेकोटी पेटवित थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी (दि.३१) किमान तपमान १४.५ इतके नोंदविले गेले होते. त्यानंतर सातत्याने तपमानात घट होत असल्याने थंडीचा कडाका वाढत आहे. बुधवारी नीचांकी तपमानाची नोंद नाशकात झाली आहे. सातत्याने घसरत असलेल्या पाऱ्यामुळे जिल्ह्णात येत्या काही दिवसांमध्ये थंडीची लाट वाढणार असल्याची शक्यता वाढली आहे. जिल्ह्णात थंडीचा वाढता जोर लक्षात घेता पुणे, औरंगाबाद महामार्गासह त्र्यंबकेश्वर रस्त्यावरदेखील उबदार कपडे विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. सिन्नरच्या मोहदरी घाटाच्या प्रारंभी मोठ्या संख्येने महामार्गालगत उबदार कपडे विक्रेत्यांनी दुकाने लावली आहेत. एकूणच थंडीचा कडाका शहरात वाढू लागल्याने नाशिककरांची पावले उबदार कपड्यांच्या खरेदीकडे वळू लागली आहेत.