शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

गोदाकाठी पुन्हा थंडीचा कडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:10 AM

गोदाकाठ भागात तापमानाचा पारा आणखी घसरला असून, गुरुवारी (दि. ९) कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात ८.८ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने अवघा निफाड तालुका कडाक्याच्या थंडीने गारठून गेला होता. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली असून, गेल्या दोन - तीन दिवसांपासून थंडीने आपला रुद्रावतार वाढवत नेल्याने गुरुवारी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात ८.८ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली.

ठळक मुद्देराज्यात नीचांकी : निफाडचा पारा ८.८ अंशांवर; द्राक्ष उत्पादक धास्तावले

निफाड : गोदाकाठ भागात तापमानाचा पारा आणखी घसरला असून, गुरुवारी (दि. ९) कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात ८.८ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने अवघा निफाड तालुका कडाक्याच्या थंडीने गारठून गेला होता.गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली असून, गेल्या दोन - तीन दिवसांपासून थंडीने आपला रुद्रावतार वाढवत नेल्याने गुरुवारी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात ८.८ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे कडाक्याच्या थंडीने निफाडकरांना गारठून टाकले होते. नाशिककरांना पुन्हा आठवडाभराने थंडीचा कडाका सहन करावा लागला. किमान तापमानाचा पारा थेट १०.२ अंशांपर्यंत घसरल्याची नोंद झाली. या हंगामातील ही नीचांकी नोंद ठरली. मागील बुधवारी १०.३ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले होते. या हंगामात पुन्हा तिसऱ्यांदा राज्यात सर्वाधिक नीचांकी तापमान नाशिकमध्ये नोंदविले गेले. ढगाळ हवामानामुळे काही दिवस गायब झालेल्या थंडीने पुन्हा एकदा जोर धरला असून. निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागात गुरुवारी ११.५ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. वाढत्या थंडीने शेतकरी धास्तावले असून, पिकांच्या वाढीवर परिणाम जाणवू लागले आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक थंडी निफाड तालुक्यात असते. मागील वर्षी राज्यातील सर्वाधिक कमी म्हणजेच ० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. यंदा मात्र काही दिवसांपूर्वी थंडीने जोर धरला होता. १० अंशावर आलेले तापमान २० अंशावर जाऊन पोहचले होते.नाशिक शहराचा किमान तापमानाचा पारा घसरत असून, नागरिकांना मागील दोन आठवड्यांपासून थंडीच्या तीव्रतेचा सामना करावा लागत आहे. नव्या वर्षाचा मागील आठवड्यातही शहर गारठलेले होते. या आठवड्याच्या मध्यावर पुन्हा थंडीची लाट शहरात आल्याने नागरिकांकडे उबदार कपड्यांचा वापर करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. बुधवारी संध्याकाळनंतर वातावरणात गारवा निर्माण झाला होता. सकाळी ८ वाजता हवामान निरीक्षण केंद्राकडून पारा मोजण्यात आला असता १०.२ अंशांपर्यंत तापमानापर्यंत खाली आल्याचे दिसून आले. दिवसभर लख्ख सूर्यप्रकाश असतानाही गारठा जाणवत होता.द्राक्ष मण्यांच्या फुगवणीवर परिणामगोदाकाठ परिसरात ऊसतोडीसाठी आलेल्या ऊसतोड कामगारांनी, शेतकऱ्यांनी, नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवून ऊब मिळवण्याचा प्रयत्न केला. कडाक्याच्या थंडीमुळे तालुक्यात दिवसभर गारवा जाणवत होता. ही थंडी गहू, कांदे पिकांना फायदेशीर ठरणार आहे. मात्र या वाढत जाणाºया कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षमण्यांना तडे पडणे, फुगवण कमी होणे, वेलींना अन्न पुरवठा कमी होणे आदी परिणाम दिसू लागल्याने द्राक्ष बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे. वाढत्या थंडीमुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू असून, तेथील धबधबेदेखील गोठले असून, किमान तापमान उणे झाले आहे. यामुळे उत्तर भारतासह उत्तर महाराष्टÑ, विदर्भ, मराठवाड्याच्या वातावरणावरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे. राज्यात नीचांकी तापमानाची नोंद बुधवारी नाशिकमध्ये झाली. महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी पारा १३ अंशांपर्यंत मोजला गेला. पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन