शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात थंडीचा कडाका कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 01:40 IST

हिवाळ्याच्या या  हंगामात सर्वाधिक नीचांकी  तापमान मंगळवारी (दि. ११) ९.४ अंश इतके नोंदविले गेले. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता शहरातील हवामान निरीक्षण केंद्राकडून ९.६ इतके किमान तापमान मोजण्यात आले. शहरात मागील दोन ते तीन दिवसांपासून थंडीचा कडाका कायम असून, नाशिककरांना हुडहुडी भरली आहे.

नाशिक : हिवाळ्याच्या या  हंगामात सर्वाधिक नीचांकी  तापमान मंगळवारी (दि. ११) ९.४ अंश इतके नोंदविले गेले.बुधवारी सकाळी साडेआठ वाजता शहरातील हवामान निरीक्षण केंद्राकडून ९.६ इतके किमान तापमान मोजण्यात आले. शहरात मागील दोन ते तीन दिवसांपासून थंडीचा कडाका कायम असून, नाशिककरांना हुडहुडी भरली आहे.जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील सर्वाधिक कमी  ८.८ अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली.जिल्ह्यातील थंडीच्या  वाढत्या कडाक्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो,  असे मत डॉक्टरांनी व्यक्तकेले आहे.  राज्यात सोमवारी (दि. १०) सर्वाधिक कमी तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली होती. शहरात किमान तापमान १२.८ तर कमाल तापमानाचा पारा थेट २८.२ अंशापर्यंत खाली घसरला होता. त्यामुळे सध्या राज्यात नाशिक महाबळेश्वरपेक्षाही अधिक थंड शहर बनले आहे. मागील काही दिवसांपासून किमान तापमानाचा पारा कमी-जास्त होत असल्याचे थंडीच्या तीव्रतेतही फरक पडत होता; मात्र अचानकपणे या आठवड्यात हवामानात कमालीचा बदल झाला. मंगळवारपासून किमान तापमानाचा पारा त्यापेक्षाही अधिक खाली घसरू लागल्याने थंडीने शहर गारठले आहे. मंगळवारी ९.४, बुधवारी ९.६ इतके किमान तापमान नोंदविले गेले. एकूणच थंडीचा कडाका वाढताच नाशिककरांनी उबदार कपड्यांच्या वापरावर भर देण्यास सुरुवात केली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक चहा, कॉफीला पसंती देत आहेत. संध्याकाळी साडेपाच वाजेनंतर हवेत गारठा जाणवण्यास सुरुवात होते तर सकाळी अकरा वाजेपर्यंत वातावरणात थंडी जाणवत असल्याचा अनुभव नाशिककरांना येत आहे. किमान तापमानाचा पारा कमी झाल्यामुळे कमाल तापमानदेखील तिशीच्या खाली सरकले आहे. या हंगामात ९.२ ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली आहे.गतवर्षापेक्षा यंदा जोर अधिकगेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी थंडीचा जोर अधिक असल्याचे हवामान खात्याकडील नोंदींवरून स्पष्ट होते. यंदा पर्जन्यमानाचे प्रमाण कमी राहिले असले तरी थंडीचा कडाका मात्र अधिक असल्याचे जाणवत आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये ९, १०, ११, १२ या तारखांना अनुक्रमे किमान तापमान १५.२, १५.४, १४.००, १३.२ अंश इतके नोंदविले गेले होते. मागील वर्षी २९ डिसेंबर रोजी सर्वाधिक नीचांकी ७.६ अंशापर्यंत किमान तापमानाची नोंद झाली होती. यावर्षी या तारखांना अनुक्रमे ११.३, १२.८, ९.४, ९.६ इतके किमान तापमान नोंदविले गेले आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणTemperatureतापमान