देवगाव : परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. थंडी रब्बी पिकांना चांगली आहे तर द्राक्षबागांना धोकादायक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एकीकडे खुशी तर दुसरीकडे दु:ख असा प्रकार पहावयास मिळत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून थंडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, हरभरा, गहू या पिकांना वाढलेली थंडी पोषक ठरते तसेच वाढत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी वाड्या, वस्त्यांवर शेकोट्या पेटवल्या जात आहेत. यातच नांदूरमधमेश्वर डावा कालवा तसेच उजव्या कालव्याला पाणी येऊन गेल्याने परिसरात अधिक थंडीचे प्रमाण असल्याचे चित्र दिसून येत आहे. सर्वाधिक थंडीचा अनुभव सध्या कालव्यालगतचे शेतकरी तसेच मजूरवर्ग घेत आहेत. यातच देवगावसह पूर्व पट्ट्यात ऊसतोडणीसाठी आलेल्या मजुरांवर त्याचा विपरित परिणाम होऊ लागला आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान ऊसतोडणीचे काम करणारे ऊसतोड कामगार थंडीमुळे उशिरा कामावर जावे लागत आहे. बाजारातील दुकानांमध्ये विविध आकर्षक रंगांमध्ये स्वेटर, स्कार्प, मफरल, कानटोपी, रूमाल, हातमौजे, विक्र ीस आले आहे.
थंडीचा कडाका कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 00:16 IST