शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोदाकाठ गारठला थंडी : कांदा, गहू उत्पादक सुखावले;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:24 IST

भुरी, तड्यांनी द्राक्ष बागाईतदार धास्तावले सायखेडा : गोदाकाठ परिसरात थंडीचा जोर वाढू लागल्याने कांदा, गहू पीक उत्पादक सुखावले असले तरी, द्राक्ष बागायईतदार मात्र धास्तावले आहेत. अतिथंडीमुळे द्राक्ष पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो. शिवाय द्राक्ष फुगवणीवरदेखील परिणाम होऊन द्राक्षमण्यांना तडे जाण्याची शक्यता असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.

भुरी, तड्यांनी द्राक्ष बागाईतदार धास्तावलेसायखेडा : गोदाकाठ परिसरात थंडीचा जोर वाढू लागल्याने कांदा, गहू पीक उत्पादक सुखावले असले तरी, द्राक्ष बागायईतदार मात्र धास्तावले आहेत. अतिथंडीमुळे द्राक्ष पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो. शिवाय द्राक्ष फुगवणीवरदेखील परिणाम होऊन द्राक्षमण्यांना तडे जाण्याची शक्यता असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.मागील महिन्यात बेमोसमी पाऊस झाला. त्यामुळे द्राक्षबागेला मणी कुज आणि डावणी या रोगांनी ग्रासले होते. अनेक बागा कुज आणि गळ झाल्यानंतरही उभ्या राहिल्या. काही ठिकाणी उताराची आणि उंचावरील जमीन असल्याने व कष्टकरी शेतकरी असल्याने महागड्या फवारण्या करून पीक वाचवले असले तरी आता पुन्हा थंडीचा जोर वाढू लागल्याने या संकटाचा सामना करावा लागणार आहे. तसेच गोदाकाठ भागात नदीलगत उसाचे क्षेत्र मोठे असल्याने ऊसतोडणी कामगार दाखल झाले आहेत. बैलगाडी, चार भांडी, मोजकेच कपडे घेऊन थाटलेला संसारात उबदार कपडे कोठून असणार? त्यांनाही या थंडीचा सामना करावा लागत आहे.वाढत्या थंडीची सर्वांना जरी डोकेदुखी ठरत असली तरी गरम कपड्यांच्या दुकानातील वाढती गर्दी दुकानदारांना सुखद धक्का देणारी आहे. कानटोपी, स्वेटर, मफरल, हॅण्डग्लोज, पायमोजे खरेदीसाठी गरम कपड्यांची दुकाने गजबजू लागली आहेत. गुलाबी थंडीने मात्र रस्त्यालगत उघड्यावर संसार थाटणाºया गरीब कुटुंबाला मोठा सामना करावा लागत आहे. पाल ठोकून राहाणारे नागरिक वाढत्या थंडीमुळे त्रस्त झाले आहेत. अंगावर फाटके कपडे, अंथरून- पांघरूण म्हणून कमी असलेल्या कपड्यांमुळे जीव मुठीत धरून रात्र काढावी लागत आहे.आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यतागहू, कांदा भाजीपाला पिकासाठी थंडी चांगली असली तरी या पिकांसाठी कमी भांडवल आणि त्या तुलनेत कमी उत्पादन मिळते मात्र द्राक्ष पिकासाठी प्रचंड भांडवल आण िउत्पादनही चांगले मिळत असल्याने शेतकर्यांचे आर्थिक गणति अवलंबून असते. प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात थंडी पडली तर द्राक्ष मान्यांना तडे जाण्याचा संभव असतो शिवाय भुरी सारखा प्रभावी रोग घडात शिरकावा करतो त्यामुळे पीक बाजारात विक्र ीसाठीजाईलच याची शास्वती नसल्याने थंडी पासून बचाव करण्यासाठी शेतकर्यांना महागडे औषधें फवारणी करावी लागत आहेखर्चात वाढ होत असल्यानेआर्थिक गणति कोलंडण्याची शक्यता आहे.एक महिन्यापूर्वी बेमोसमी पावसाने हजेरी लावली होती त्यात कुज ,डावणी, गळ यामुळे द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाले त्यात आठ दिवसापासून वाढलेल्या थंडीमुळे शेतकर्यांसमोर पुन्हा एकदा सुलतानी संकट उभे राहिले आहे, भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी शेतकर्यांना आटापिटा करावा लागत आहे शिवाय थंडीने द्राक्ष फुगवणीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे-दत्तू मुरकुटे, शेतकरी, म्हाळसाकोरेगोदाकाठ भागात वाढत्या थंडीमुळे कांदा, ऊस, गहू पिकावर चांगला परिणाम होत असला तरी द्राक्ष पिकावर भुरीच्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो त्यामुळे भुरी रोगावरील औषधें खरेदी करण्यासाठी शेतकर्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसतो पर्यायाने खर्च वाढत आहे- सोपान खालकर, औषध विक्रते.