शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कर्मचाऱ्याविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार

By admin | Updated: February 17, 2017 00:18 IST

कारवाईसाठी आयुक्तांकडे पाठविला अहवाल

 नाशिक : महापालिकेच्या नगरसचिव विभागात कार्यरत असलेल्या योगेश कमोद या कर्मचाऱ्याविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल झाली असून, आचारसंहिता कक्षाने सदर तक्रार पुढील कार्यवाहीसाठी आयुक्तांकडे पाठविली आहे.महापालिका सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होता नाही. प्रचारात सहभाग अथवा उमेदवारी करायची असल्यास अगोदर सेवेचा राजीनामा द्यावा लागतो. दरम्यान, महापालिकेच्या नगरसचिव विभागात कार्यरत असलेले योगेश कमोद हे निवडणुकीत स्वत:च्या चॅनलसाठी मुलाखती घेत असून त्यामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार बहुजन भूमिहीन किसान कामगार संघर्ष समितीने आचारसंहिता कक्षाकडे केली आहे. तक्रारीत म्हटले आहे, योगेश कमोद यांची नाशिकरोड विभागात जन्म-मृत्यू विभागात काही महिन्यांपूर्वी बदली झाली होती. परंतु चार महिन्यांपूर्वीच त्यांची बदली रद्द होऊन ते नगरसचिव विभागात कार्यरत आहेत. त्यांनी दीड महिन्याची रजा घेतली असून, सध्या ते त्यांच्या खासगी चॅनलसाठी निवडणुकीतील उमेदवारांच्या मुलाखती घेत असल्याने आचारसंहितेचा भंग होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सदर तक्रार ही आयुक्तांकडे पाठविण्यात आल्याची माहिती आचारसंहिता कक्षप्रमुख सरिता नरके यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.