शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेने ग्रामपंचायतीच्या मुसक्या आवळल्या, प्रचारावर निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 17:14 IST

नाशिक : जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन उमेदवारांकरवी नामांकन भरले जात असताना या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता अधिकाधिक कडक करून राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. जाहीर प्रचारावर निर्बंध लावतांनाच, उमेदवारी दाखल करण्यासाठी फक्त तीनच कार्यकर्त्यांना मुभा देण्यात आली आहे.लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर ग्रामपंचायतींच्या ...

नाशिक : जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन उमेदवारांकरवी नामांकन भरले जात असताना या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता अधिकाधिक कडक करून राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. जाहीर प्रचारावर निर्बंध लावतांनाच, उमेदवारी दाखल करण्यासाठी फक्त तीनच कार्यकर्त्यांना मुभा देण्यात आली आहे.लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीचे नामांकन आॅनलाइन पद्धतीने भरण्याची सक्ती करण्यात आली असून, यंदा सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून घेण्यात येणार असल्याने त्यादृष्टीने गावातील भाऊबंदकी, राजकीय वैमनस्य या सर्व गोष्टींचा विचार करीत आयोगाने आचारसंहितेच्या माध्यमातून त्यावर निर्बंध आणले आहेत. ज्या जिल्ह्यातील एकूण गावांच्या ५० टक्के ग्रामपंचायतींच्या निवडणुका असतील त्या संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता जारी करण्याचा तर ज्या तालुक्यातील ५० टक्के ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील त्या तालुक्यात संपूर्ण आचारसंहिता जारी करण्यात येणार असून, सध्या ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत त्या ग्रामपंचायतीला लागून असलेल्या गावांमध्येदेखील आचारसंहिता जारी राहणार आहे. ज्या ठिकाणी निवडणुका आहेत त्या ठिकाणी आचारसंहिता जारी असेल, अन्यत्र विकासकामे करण्यास कोणतीही हरकत आयोगाने ठेवली नसली तरी, लगतच्या मतदारांवर प्रभाव पडेल असे कोणतेही कृत्य करण्यास मात्र मज्जाव करण्यात आला आहे.ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यापासून ते मतमोजणी पूर्ण होईपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाºयाच्या कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरात जमावबंदी लागू करण्यात येणार असून, नामांकन भरण्यास येणाºया उमेदवारासोबत फक्त तीन व्यक्तींनाच निवडणूक अधिकाºयाच्या दालनात प्रवेश असणार आहे. गावाचे क्षेत्र तसेच लोकसंख्या मर्यादित असल्यामुळे ग्रामपंचायतीत उमेदवारी करणाºया उमेदवाराला प्रभागात फक्त एकच प्रचार कार्यालय उघडण्यास अनुमती असून, प्रचारासाठी वाहन व कार्यकर्त्यांची गरज नसल्याचे आयोगाने म्हटले आहे; मात्र उमेदवाराने मागणी केल्यास एक चारचाकी किंवा दोन दुचाकी वाहने प्रचारासाठी वापरता येतील त्याची रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे व एका उमेदवाराने वापरलेले वाहन दुसरा उमेदवार प्रचारासाठी वापरू शकणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.