शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

रणरणत्या उन्हाळ्यात कोळुष्टी टँकरमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 16:06 IST

पेठ -एका बाजूला दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रात पाणी मिळवण्यासाठी गावखेड्यातील लोकांना करावे लागत असलेले जीवघेणे प्रयत्न माध्यमांमधून प्रसिद्ध होत आहेत. परंतु त्याच वेळी दुसर्या बाजूला ऐन उन्हाळ्यात आपल्या दारात पाणी आल्याने पेठ तालुक्यातील कोळुष्टीचे गावकरी मात्र आनंदाने जल्लोष करत आहेत. ही विरोधाभासी किमया घडवली आहे सोशल नेटवर्किंग फोरमने. अलीकडेच पूर्णत्वास गेलेला हाच पाणी प्रकल्प काल गावकर्यांकडे सुपूर्द करण्यात आला.

पेठ -एका बाजूला दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रात पाणी मिळवण्यासाठी गावखेड्यातील लोकांना करावे लागत असलेले जीवघेणे प्रयत्न माध्यमांमधून प्रसिद्ध होत आहेत. परंतु त्याच वेळी दुसर्या बाजूला ऐन उन्हाळ्यात आपल्या दारात पाणी आल्याने पेठ तालुक्यातील कोळुष्टीचे गावकरी मात्र आनंदाने जल्लोष करत आहेत. ही विरोधाभासी किमया घडवली आहे सोशल नेटवर्किंग फोरमने. अलीकडेच पूर्णत्वास गेलेला हाच पाणी प्रकल्प काल गावकर्यांकडे सुपूर्द करण्यात आला. या लोकार्पण सोहळ्यास खास अमेरिकेतून आलेले उद्योजक वसंत राठी, किशोर राठी, डॉ. अभिजीत राठी, फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.व्यवसायासाठी अमेरिकेत रहात असताना एसएनएफ आदिवासी भागात करत असलेल्या कामाची योगेश कासट यांच्याकडून माहिती मिळाली. त्यामुळे कोळुष्टी सारख्या दुर्गम गावाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मदत करता आली. या गावकर्यांच्या चेहर्यावरील आनंद बघणे हा आयुष्यभरासाठी अमूल्य ठेवा आहे असे राठी यांनी कार्यक्र मात बोलताना सांगितले.गेल्या कित्येक वर्षांपासून उन्हाळ्यात दोन तीन किलोमीटरवरून डोक्यावर पाणी आणावे लागायचे. आमचे हे कष्ट राठी बंधू आणि फोरमच्या लोकांनी वाचवले याबद्दल त्यांचे आभार कसे मानावे हेच कळत नाही अशी प्रतिक्रि या ग्रामपंचायत सदस्य शेवंता बोरसे यांनी दिली. गावकऱ्यांचे श्रमदान, टीम फोरमचे तांत्रिक ज्ञान, आण िलोकसहभागातून आर्थिक मदत या एसएनएफ पॅटर्नच्या त्रिसूत्रीतून हे काम पूर्ण करण्यात आले. अ‍ॅडव्हान्स एन्झाईम्स या कंपनीने कोळुष्टी पाणी प्रकल्पासाठी देणगी दिली. ग्रामपंचायतनेही पाण्याची टाकी बांधली. सर्वांच्या एकत्रीत प्रयत्नातून चार मिहन्यात हा प्रकल्प पूर्ण करु न अतिशय ऊत्साहात लोकार्पण करण्यात आले. रामदास शिंदे यांनी सुत्रसंचलन तर संदिप बत्तासे यांनी आभार मानले.

टॅग्स :Nashikनाशिक