शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

बैलाच्या दोराऐवजी हाती आला कोब्रा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 14:42 IST

नांदगाव : खुंट्याला बांधलेला बैल सुटल्याने त्याच्यामागे धावणाऱ्या बालकाच्या हातात बैलाच्या दोराऐवजी कोब्रा आल्याने त्याने एकदा नव्हे; तर दोन्ही हातांना कडकडून दंश केला. या हल्यात गंभीर जखमी झालेल्या बालकाचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना दोन दिवसांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर यश आले.

नांदगाव : खुंट्याला बांधलेला बैल सुटल्याने त्याच्यामागे धावणाऱ्या बालकाच्या हातात बैलाच्या दोराऐवजी कोब्रा आल्याने त्याने एकदा नव्हे; तर दोन्ही हातांना कडकडून दंश केला. या हल्यात गंभीर जखमी झालेल्या बालकाचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना दोन दिवसांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर यश आले. सदर घटना तालुक्यातील फुलेनगर शिवारात मंगळवारी (दि.७) सायंकाळी घडली.  फुलेनगर थापा शिवारात बांधलेला ज्ञानेश्वर राऊत यांचा बैल सायंकाळी अचानक सुटला. सैरावैरा धावत सुटलेला बैल उभ्या पिकाची नासाडी करेल म्हणून त्याला पकडण्यासाठी राऊत यांचा बारा वर्षीय मुलगा अथर्व बैलामागे धावत गेला. बैलाचा दोर धरतांना तो हातातून निसटला. खाली वाकून दोर उचलण्याच्या प्रयत्नात असतांना, त्याच ठिकाणी गारव्याला पडून असलेला कोब्रा अथर्वच्या हातात आला. काहीही कळण्याच्या आत त्याच्या दोन्ही हातांना नागाने कडकडून दंश केला. त्याला उपचारासाठी तातडीने नांदगांव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉ. रोहन बोरसे यांनी अथर्वला काही तासात तब्बल २३ प्रतिविषा (एएसव्ही) ची इंजेक्शन्स दिली. मात्र दुसºया दिवशी त्याला भेटायला आलेले सर्पमित्र प्रभाकर निकुंभ यांना अथर्वची प्रकृती गंभीर होत चाललयाची शंका आल्याने तात्काळ डॉ. बोरसे यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी पुन्हा प्रतिविषाचे १३ डोस दिले. यावेळी राऊत कुटुंबातील सर्वच सुन्न झाले होते. त्यानंतर दैव बलवत्तर होते म्हणून अथर्वचे प्राण वाचले असले तरी नागाने चावा घेतल्याने डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक