शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
3
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
4
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
5
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
6
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
7
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
8
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
9
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
11
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
12
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
13
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
15
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
16
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
17
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
19
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
20
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या

कॉलेजरोडवरील मोची शोरूमला आग

By admin | Updated: September 28, 2015 23:37 IST

अडीच कोटींचे नुकसान : गंगापूर पोलिसांत नोंद

नाशिक : कॉलेजरोडवरील इझी डे मॉलमधील पादत्राणे विक्रीच्या मोची फूटवेअर शोरूमला रविवारी (दि़२७) रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली़ या आगीमध्ये दुकानातील विक्रीच्या मालासह फर्निचरसह जळून खाक झाले असून, सुमारे अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येतो आहे़ सुदैवाने जीवितहानी टळली असून, अग्निशमन दलाच्या सहा बंबांच्या साहाय्याने ही आग विझविण्यात आली़ दरम्यान, ही आग शॉटसर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे़कॉलेजरोडवरील इझी डे मॉलच्या दर्शनीभागात असलेल्या मोची फू टवेअरला रविवारी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली़ गणेश विसर्जनामुळे या दुकानातील कामगारांना दुपारी दोन वाजताच सुटी देण्यात आली होती़ दुकानातील विक्रीसाठी ठेवण्यात आलेला सर्व माल तसेच फर्निचर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे़ दरम्यान, ही आग लागल्याचे समजताच नागरिकांनी मुख्य अग्निशमन विभागाला माहिती दिली़ त्यानंतर काही मिनिटांतच अग्निशमन विभागाचे सहा बंब व सुमारे ५५ कर्मचाऱ्यांसह विभागप्रमुख अनिल महाजन, तिडके, बैरागी घटनास्थळी दाखल झाले़आग लागल्यानंतर अग्निशमन विभाग लवकर पोहोचला असला तरी शोरूमला लावलेले कुलूप उघडण्यास विलंब झाल्याने आग भडकली़ दुकानातील लेदरच्या पादत्राणांमुळे मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने आग विझविण्यात अडचण आली़ तसेच शोरूममधील पोटमाळ्यात जाण्यासाठी केवळ अरुंद बोळ असल्याने व ती कोसळल्याची शक्यता असल्याने बाहेरून आग विझविण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला़ रात्री दहा वाजता लागलेली आग पहाटे चार वाजेच्या सुमारास आटोक्यात आली़दरम्यान, सोमवारी दुपारी विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली तसेच व्यवस्थापक सलीम खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)