शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी बॅँकांची शक्कल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:33 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने त्याची काटेकोर अंमलबजावणीचा भाग म्हणून लोकप्रतिनिधींकडील शासकीय वाहने जमा करण्यात आली असली तरी, राजकीय व्यक्तींच्या ताब्यात असलेल्या सहकारी संस्था व बॅँकांची वाहनेदेखील निवडणूक आचारसंहितेनुसार शासन जमा होणे अपेक्षित आहे, तथापि, जिल्ह्यातील सहकारी बॅँका व संस्थांनी आपली वाहने अद्याप जमा केली नसून, ही वाहने आरटीओमार्फत जप्त करण्याच्या भीती पोटी बॅँकांनी वाहनांवर लावलेले बॅँकेच्या नावाचे स्टिकर काढून टाकले आहेत.

ठळक मुद्देनिवडणूक : वाहन जप्ती टाळण्यासाठी स्टिकर काढून वसुलीसाठी वापर

नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने त्याची काटेकोर अंमलबजावणीचा भाग म्हणून लोकप्रतिनिधींकडील शासकीय वाहने जमा करण्यात आली असली तरी, राजकीय व्यक्तींच्या ताब्यात असलेल्या सहकारी संस्था व बॅँकांची वाहनेदेखील निवडणूक आचारसंहितेनुसार शासन जमा होणे अपेक्षित आहे, तथापि, जिल्ह्यातील सहकारी बॅँका व संस्थांनी आपली वाहने अद्याप जमा केली नसून, ही वाहने आरटीओमार्फत जप्त करण्याच्या भीती पोटी बॅँकांनी वाहनांवर लावलेले बॅँकेच्या नावाचे स्टिकर काढून टाकले आहेत.मार्च महिना हा बॅँकेच्या आर्थिक वर्षासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, एरव्ही वर्षभर थकबाकीदार, कर्जदारांकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या बॅँका मात्र मार्च महिन्यात पैसे वसुलीसाठी तगादा लावला जातो, त्यासाठी बॅँकांकडूनच विशेष वसुली पथक गठीत करून बॅँकेच्या वाहनाने गावोगावच्या कर्जदारांच्या घरी जावून वसुली केले जाते. यंदा मात्र मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यामुळे नियमानुसार सहकारी संस्था व सहकारी बॅँकांनाही त्यांची वाहने शासन जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तशा सूचना सहकार विभागाने सर्व सहकारी बॅँका व संस्थांना दिल्या आहेत. प्रत्येक बॅँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांबरोबरच वसुलीसाठी तीन ते चार वाहने असतात. लोकसभा निवडणुकीचा आवाका पाहता, संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाला सुमारे तीन हजारांहून अधिक वाहनांची गरज आहे. परंतु निवडणूक आचारसंहिता जारी होऊन पाच दिवसांचा कालावधी उलटला तरी जिल्हा बॅँकेसह शहरातील नामको, जनलक्ष्मी, गोदावरी, राजलक्ष्मी, विश्वास आदी सहकारी बॅँकांनी त्यांची वाहने जमा केली नसल्याची बाब निवडणूक यंत्रणेच्या निदर्शनास आली आहेत. विशेष म्हणजे यातील काही बॅँकांनी आपल्याकडे वाहनेच नाहीत असा पवित्रा घेतला, परंतु त्यांची वसुली पथके मात्र वाहने घेऊन राजरोस फिरत असल्याचे चित्र आहे.कारवाई होण्याची शक्यतासहकार विभागाने बजावूनही जर या बॅँकांनी वाहने जमा केली नाहीत, तर आरटीओमार्फत ती जेथे असतील तेथून ताब्यात घेण्याची कार्यवाही होऊ शकते याची पुरेपूर जाणीव असल्यामुळे या बॅँकांनीही नवीन शक्कल लढविली असून, वसुलीसाठी फिरणाºया बॅँकांच्या वाहनांवर बॅँकेच्या नावाचे असलेले स्टिकर काढून टाकले आहेत. जेणे करून वाहन बॅँकेचे आहे, याचा खुलासा होणे कठीण झाले आहे.

टॅग्स :NashikनाशिकBanking Sectorबँकिंग क्षेत्र