शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँकेच्या वसुलीसाठी सहकार खाते सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 01:19 IST

जिल्हा बॅँकेच्या थकबाकीदारांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत असलेल्या अडचणींचा विचार करता, सहकार विभागानेच याकामी पुढाकार घेतला असून, अनेक वर्षांपासून थकबाकी असलेल्या संस्था व थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी बॅँकेला दिले आहेत.

नाशिक : जिल्हा बॅँकेच्या थकबाकीदारांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत असलेल्या अडचणींचा विचार करता, सहकार विभागानेच याकामी पुढाकार घेतला असून, अनेक वर्षांपासून थकबाकी असलेल्या संस्था व थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी बॅँकेला दिले आहेत. त्यामुळे आता वसुलीसाठी बॅँकेकडून आगामी काळात थकबाकादीरांच्या मुसक्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे.  जिल्हा बँंकेच्या आजी-माजी संचालकांनी यापूर्वी केलेल्या नियमबाह्य कर्जवाटप प्रकरणी ३८ आजी-माजी संचालकांना सहकार विभागाच्या ८८ अंतर्गत यापूर्वीच नोटिसा देण्यात आल्या असून, जिल्हा बँकेनेही या संचालकांना नोटिसा बजावून त्यांचे म्हणणे मागविले आहे. त्याचबरोबर ३४७ कोटींची थकबाकी थकविल्याप्रकरणी १२ सहकारी संस्थांनाही मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजाविल्या आहेत. मात्र, या कारवाईत सहकार विभागाकडूनच खो घातला जात असल्याची चर्चा होती. त्यामुळे जिल्हा बँकेची कारवाईदेखील संथगतीने सुरू होती. यासंदर्भात सहकार आयुक्तांकडे पत्रव्यवहार झाला असता, त्याच्या आदेशान्वये शुक्रवारी विभागीय सहनिबंधक कार्यालयात सहकार खात्याचे अधिकारी व बॅँकेच्या संचालकांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीस विभागीय सहनिबंधक भालेराव, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने, जिल्हा बँक अध्यक्ष केदा अहेर प्रामुख्याने उपस्थित होते.बैठकीत प्रामुख्याने थकबाकीचा आढावा घेण्यात आला. बैठकीस जिल्हा बँकेचे संचालक गणपतबाबा पाटील, धनजंय पवार, गणेश गिते, बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सतीश खरे आदी उपस्थित होते.दुष्काळी परिस्थिती असल्याने शासनाच्या आदेशान्वये नियमित वसुली थांबविण्यात आल्याचे बॅँकेकडून सांगण्यात आले. मात्र बडे थकबाकीदार आणि थकीत असलेल्या बिगर शेती कर्ज वसुलीबाबत कायदेशीर कारवाई करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. सहकार कायदा १०१ अतंर्गत कारवाईचे निर्देश भालेराव यांनी बँक प्रशासनाला दिले. फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी असलेल्या संस्थांवर गुन्हे दाखल करण्यासही यावेळी परवानगी देण्यात आली.

टॅग्स :bankबँकNashikनाशिक