शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे द्राक्षपंढरी हादरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:30 IST

सायखेडा : बेमोसमी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष पंढरी पुन्हा हादरली असून; द्राक्ष उत्पादक शेतकरी फवारणीच्या वाढत्या खर्चामुळे ...

सायखेडा : बेमोसमी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष पंढरी पुन्हा हादरली असून; द्राक्ष उत्पादक शेतकरी फवारणीच्या वाढत्या खर्चामुळे हवालदिल झाले आहेत.

दोन दिवसांपासून जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या बेमोसमी पावसाचे आणि ढगाळ वातावरण तयार झाले आहे. कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांची संकटांनी यंदाही पाठ सोडली नाही. मागील वर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या शेवटी आणि रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने जेरीस आणले आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी पाऊस पडत आहे. द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्‍यात पावसाने हजेरी लावली आणि शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. शेतकऱ्यांच्या अनेक बागा दोडा आणि फ्लॉवरिंग अवस्थेत आहेत. दोडा आणि फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये असणाऱ्या बागांना जास्त फटका बसून त्याची गळ आणि कुज होते. ढगाळ हवामानाचा फटका द्राक्ष बागांना बसतो. गेल्या काही दिवसांपासून वातावरण ढगाळ असल्याने द्राक्ष बागांना पुरेसे ऊन मिळत नाही आणि त्यामुळे भागांची गळ, कूच होऊ लागली आहे. निफाड तालुक्यातील ३५ टक्के द्राक्षबागा गळीने खराब झाल्या आहेत. यामुळे द्राक्ष पंढरीला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

----------

पिकांना सातत्याने फवारणी करावी लागत असल्यामुळे खर्चात वाढ होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. उत्पादनापेक्षा खर्च जास्त होत असल्यामुळे द्राक्ष पीक यंदा तोट्यात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

--------------------------

दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या लाखो रुपये खर्च करून उभ्या केलेल्या द्राक्ष बागा पुन्हा एकदा संकटात सापडल्या आहेत. द्राक्ष पंढरीमध्ये मोठ्या प्रमाणातील बागा आता फ्लॉवरिंग, दोडा अवस्थेत असल्याने या भागांची गळ व कूज होण्यास सुरुवात झाली आहे.

- सचिन डेर्ले, द्राक्ष उत्पादक, शिंगवे.

(१२ सायखेडा)

===Photopath===

121220\12nsk_2_12122020_13.jpg

===Caption===

(१२ सायखेडा)