शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ढगाळ वातावरणाने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:49 IST

नाशिक : जूनच्या पहिल्या दिवसापासूनच हवामानात झालेल्या बदलामुळे मान्सूनपूर्व पावसाने शहर व परिसरात हजेरी लावल्याने शहरात रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण व गार वारे वाहू लागल्याने तपमानात कमालीची घट होऊन उष्णतेच्या लाटेत भाजून निघणाऱ्या नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. रविवारी दुपारनंतर अल्प सूर्यदर्शन झाले, परंतु दिवसभर आल्हाददायक वातावरणात नाशिककरांनी त्र्यंबकेश्वर, घोटी, ...

ठळक मुद्देअल्प सूर्यदर्शन  शहर परिसरात तपमानात कमालीची घट

नाशिक : जूनच्या पहिल्या दिवसापासूनच हवामानात झालेल्या बदलामुळे मान्सूनपूर्व पावसाने शहर व परिसरात हजेरी लावल्याने शहरात रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण व गार वारे वाहू लागल्याने तपमानात कमालीची घट होऊन उष्णतेच्या लाटेत भाजून निघणाऱ्या नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. रविवारी दुपारनंतर अल्प सूर्यदर्शन झाले, परंतु दिवसभर आल्हाददायक वातावरणात नाशिककरांनी त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरीत जाऊन सुटीचा आनंद लुटला.गेल्या तीन महिन्यांपासून तपमानाचा पारा ३८ ते ४० सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यामुळे शुकशुकाट होणारे रस्ते रविवारी गर्दीने फुलून निघाले होते. एकेकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाºया नाशिककरांना तीन महिन्यांपासून उष्णतेची लाट सहन करावी लागली. सलग ३८ ते ३९ तपमानामुळे नाशिककर घामाघूम झाले होते. दुपारच्या वेळेत तर रस्त्यावरची वर्दळही कमी झाली होती. परंतु जूनची सुरुवात होताच हवामानात तत्काळ बदल झाला. १ जून रोजी दुपारनंतर आकाशात ढगांनी गर्दी करीत, वादळ सुरू झाल्याने काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. शनिवारीदेखील पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे सर्वत्र गारवा निर्माण झाला.राज्यात अद्याप मान्सूनचे आगमन झालेले नसले तरी, मान्सूनपूर्व वातावरणाने मोठा दिलासा दिला आहे. दि. ३० मे ते ३ जून या पाच दिवसांत तपमानात मोठी घट झाली असून, शनिवारी ३५ सेल्सिअस असलेले तपमान रविवारी घसरून २८ वर पोहोचले.ढगाळ हवामान, सोसाट्याच्या वाºयामुळे आल्हाददायक वातावरण तयार झाल्याने नाशिककरांनी रविवारची सुटी आनंदात घालविली. अनेकांनी त्र्यंबकेश्वर, कसारा घाटाकडे धाव घेत निसर्गाचा आनंद लुटला.