शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

सतारीच्या तारांतून बरसले ‘मेघ’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:10 IST

नाशिक : एकीकडे बरसणारे मेघ अन् दुसरीकडे रिमझिम बरसणारी सतार, अशा अनोख्या योगाचा आनंद नाशिकच्या रसिक कानसेनांनी घेतला. ...

नाशिक : एकीकडे बरसणारे मेघ अन् दुसरीकडे रिमझिम बरसणारी सतार, अशा अनोख्या योगाचा आनंद नाशिकच्या रसिक कानसेनांनी घेतला. कलारंग उपक्रमात प्रख्यात सतारवादक प्रसाद रहाणे यांच्या बहारदार सादरीकरणाने वर्षाऋतूचा आनंद द्विगुणित केला.

जनस्थान या व्हाॅटस्‌ॲप ग्रुपमधील कानसेनांनी कलारंग मैफलीचा आनंद घेतला. कलारंगचे पाचवे पुष्प सुप्रसिद्ध सतारवादक प्रसाद रहाणे यांनी गुंफले.

एलिफंटा फेस्टिव्हल, गोपीकृष्ण महोत्सव, केरळमधील सूर्या महोत्सव, खजुराहो फेस्टिव्हल, लंडनमधील पॅलॅडियम थिएटर, अशा नामवंत ठिकाणी सतारवादनाचे कार्यक्रम करणाऱ्या प्रसादजींनी अनेक नामवंत कलाकारांबरोबर सतारीची साथसंगत केली आहे. पंडित शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे, सुरेश वाडकर, पंडित जसराज, अशा अनेक दिग्गजांना त्यांनी साथ दिली आहे. सतारवादनाबरोबरच प्रसाद रहाणे तबलावादनातही पारंगत आहेत‌. कलारंगच्या मैफलीत त्यांच्या सतारवादनाचा आनंद घेण्याचा योग कलाप्रेमींना आला. शास्त्रीय, उपशास्त्रीय, फ्युजन व समकालीन संगीत प्रकारांवर प्रभुत्व असलेल्या प्रसादजींच्या वादनात कलारंगचे रसिक तल्लीन झाले. मैफलीची सुरुवात करताना राग ‘मेघ’ सादर केल्यानंतर आलाप, जोड हे वाजवून झाल्यावर प्रसादजींनी गत सादर केली. गत सादर करताना तबल्याची साथ अतिशय उपयुक्त ठरते. सतार वर द्रुत तीन ताल, झपताल वाजवताना सुजित काळे यांनी अतिशय सुंदर तबल्याची साथ दिली. परंपरा आणि आधुनिकता, चिंतन आणि रंजकता यांचा एक सुरेल संगम सतारवादक प्रसाद रहाणे यांनी कलारंगच्या मैफलीत साधत कलारंगाच्या मैफलीचा समारोप केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभय ओझरकर, स्नेहल एकबोटे, गणेश शिंदे यांनी परिश्रम घेतले.

‘कजरी’ची अनोखी अनुभूती!

मैफलीच्या प्रारंभी सादर केलेल्या मेघ रागाने प्रारंभीच पुढील सुरांच्या बरसातीचे संकेत दिले होते. त्यानंतर मिश्र पिलू रागातील कजरी रसिकांना भावली. वर्षाऋतूतील आल्हाददायक वातावरणाची अनुभूती कजरीमध्ये करण्यात येते. म्हणूनच कजरी ऐकतानाच जणू जलधारांमध्ये मनसोक्त भिजण्याचा आनंद सर्व रसिकांना मिळत होता.

फोटो

२०प्रसाद रहाणे